मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  गोध्रा हत्यांकांडातील आरोपींचा राज्यात दरोडा; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

गोध्रा हत्यांकांडातील आरोपींचा राज्यात दरोडा; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

Jul 23, 2022, 02:37 PM IST

    • Maharashtra Crime News : देशात प्रचंड गाजलेल्या गोध्रा हत्याकांडातील दोन आरोपींनी महाराष्ट्रात दरोडा टाकून पसार झाले होते. परंतु आता पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना छापेमारी करून अटक केली आहे.
Maharashtra Crime News (HT_PRINT)

Maharashtra Crime News : देशात प्रचंड गाजलेल्या गोध्रा हत्याकांडातील दोन आरोपींनी महाराष्ट्रात दरोडा टाकून पसार झाले होते. परंतु आता पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना छापेमारी करून अटक केली आहे.

    • Maharashtra Crime News : देशात प्रचंड गाजलेल्या गोध्रा हत्याकांडातील दोन आरोपींनी महाराष्ट्रात दरोडा टाकून पसार झाले होते. परंतु आता पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना छापेमारी करून अटक केली आहे.

Nagpur Crime News : गुजरातमध्ये घडलेलं बहुचर्चित गोध्रा हत्याकांडात दोन आरोपींना आठ वर्षांची शिक्षा झाली होती. त्यानंतर कारावास पूर्ण झाल्यानंतर आरोपींनी चक्क महाराष्ट्रात दरोडा टाकला. नागपूरातील फ्लिपकार्टच्या गोदामावर गोध्रा हत्याकांडातील दोन आरोपींनी दरोडा टाकल्यानं शहरात खळबळ उडाली होती. त्यामुळं या प्रकरणात बरोबर एक महिन्यानंतर कारवाई करत नागपूर पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरातील फ्लिपकार्टच्या गोदामावर दरोडा पडल्याची माहिती नागपूर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळं पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करत त्यांच्या वाहनासमोर गाडी लावून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघांपैकी एका आरोपीनं पोलिसांनाच लोखंडी रॉडनं मारायला सुरुवात केली. त्यात एक पोलिस निरिक्षक जखमी झाले, तेव्हापासून पोलीस या आरोपींच्या शोधात होते.

काय आहे नेमकं प्रकरण?

एक महिन्यांपूर्वी नागपूरात एका लुटारुंच्या टोळीनं एमआयडीसी भागात फ्लिपकार्टच्या गोदामावर दरोडा टाकल्याची माहिती पोलिसांना मिळाली, पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करत त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपीनं एका पोलिसाला लोखंडी रॉडनं मारहाण करत पळ काढला, तेव्हापासून पोलीस आरोपींच्या मागावर होते.

त्यानंतर काल पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर नागपूर पोलिसांनी ग्रोध्रा आणि बालाघाटमध्ये छापेमारी केली, त्यात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून या दोन्ही आरोपींचा संबंध २००२ मधील गोध्रा हत्याकांडाशी आहे. दोन्ही आरोपींनी गोध्रा हत्याकांडात आठ वर्षांचा कारावास भोगला असून शिक्षा पूर्ण केल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या राज्यात दरोडा टाकायला सुरुवात केल्याचं नागपूर पोलिसांनी सांगितलं आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या