मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Crime: बीकेसीत बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड! ५,१०,१००,५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त

Mumbai Crime: बीकेसीत बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड! ५,१०,१००,५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त

May 05, 2024, 11:46 AM IST

    • Mumbai Crime news : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या काळात मुंबई पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्यांचे मोठे रॅकेट उघड केले आहे. बिकेसीत हा कारखाना चालवला जात होता.
बीकेसीत सापडला बनावट नोटा तयार करण्याच्या कारखाना! ५,१०,१००,५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त

Mumbai Crime news : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या काळात मुंबई पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्यांचे मोठे रॅकेट उघड केले आहे. बिकेसीत हा कारखाना चालवला जात होता.

    • Mumbai Crime news : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या काळात मुंबई पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्यांचे मोठे रॅकेट उघड केले आहे. बिकेसीत हा कारखाना चालवला जात होता.

Mumbai Crime news : लोकसभा निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली जात आहे. मुंबईत २० मे रोजी मतदान होणार आहे. उमेदवार प्रचारात गुंतले आहेत. या धामधुमीत मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. शनिवारी रात्री वांद्रे-कुर्ला संकुल येथील भारत नगर परिसरात बनावट नोटा तयार करणाऱ्या एका कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली असून येथून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. येथे ५, १०, २०, १०० आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या जात होत्या.

ट्रेंडिंग न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Viral News : विमानतळावर प्रवाशाच्या पँटमध्ये सुरू होती चुळबुळ! पोलिसांनी अटक करून तपासले असता निघाले साप

मुंबई पोलिसांना बीकेसी येथे एक बनावट नोटा तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथक तयार करून शनिवारी रात्री येथे धाड टाकण्यात आली. या याठिकाणी बनावट नोटा तयार करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांना दिसले. या प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच बनावट नोटा आणि त्यासाठी लागणाऱ्या कागदाचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी नौशाद शाह, अली सय्यद या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. पोलिस सध्या आरोपींची चौकशी करत आहेत. या नोटा कुणाला वितरित करण्यात आल्या याचा शोध पोलिस घेत आहेत.

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ भीषण अपघात, तिघे ठार, दोघे जखमी

दादर व सायनमधून मोठी रोकड जप्त

मुंबई पोलिसांनी कारवाई करत काही दिवसांपूर्वी दादर आणि सायन भांडुप येथून साडेतीन कोटींची रोकड एका गाडीतून जप्त केली होती. दरम्यान, ही रोडक एका एटीएम व्हॅनची असल्याचे समोर आले आहे. मात्र, यानंतर ही गाडी सोडून देण्यात आली होती. तर सायन येथे एका कारमधून १ कोटी ८७ लाख ८० हजार रुपये जप्त करण्यात आले होते. याची माहिती आयकर खात्याला देण्यात आली होती. दादर येथे देखील कारवाई करून मोठी रक्कम जप्त करण्यात आली होती.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

लोकसभा निवडणुकीत गैरप्रकार टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईत अनेक नाक्यावर आणि चौकात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. येथे संशयित असणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या