मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ahmednagar accident : अहमदनगरमध्ये ओव्हरटेक करण्याच्या नादात एसटी-कारचा भीषण अपघात; ४ ठार, ३ जखमी

Ahmednagar accident : अहमदनगरमध्ये ओव्हरटेक करण्याच्या नादात एसटी-कारचा भीषण अपघात; ४ ठार, ३ जखमी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 05, 2024 09:26 AM IST

Ahmednagar accident : अहमदनगर येथे आज सकाळच्या सुमारास एसटीबस आणि इर्टिगा गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जण ठार झाले असून तिघे जण जखमी झाले आहेत.

अहमदनगमध्ये ओव्हरटेक करण्याच्या नादात एसटी-कारचा भीषण अपघात; ४ ठार, ३ जखमी
अहमदनगमध्ये ओव्हरटेक करण्याच्या नादात एसटी-कारचा भीषण अपघात; ४ ठार, ३ जखमी

Ahmednagar accident : अहमदनगर येथे आज एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या नादात कार बसला जाऊन समोरासमोर धडकली. हा अपघात ऐवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा यात चक्काचूर झाला. हा अपघात श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव जवळ झाला. या घटनेत चार जण ठार झाले आहे तर तिघे जण जखमी झाले आहेत. या अपघतामुळे या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

ट्रेंडिंग न्यूज

Devendra Fadnavis : 'फडणवीसांविरोधात रचण्यात आल होता मोठा कट'; 'या' नेत्याच्या ट्विटमुळे खळबळ, लवकरच करणार गौप्यस्फोट

दत्तात्रेय बळीराम खेतमाळीस, भाऊसाहेब बाबुराव मडके, हरी तुकाराम लडकत, विश्वनाथ लक्ष्मण नन्नवरे अशी या अपघातात ठार झालेल्या नागरिकांची नावे आहेत. तर विठ्ठल गणपत डोके, रंगनाथ मुरलीधर खेतमाळीस, रोहिदास हरिभाऊ सांगळे अशी जखमी झालेल्या नागरिकांची नावे आहेत.

Viral News : हनिमूनसाठी बँकॉकला गेली; पतीचे गुपित पुढे आल्याने हैराण झाली पत्नी, उचलले 'हे' पाऊल! वाचा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीगोंदा येथून एक एसटीबस ही शिरूरला जाण्यासाठी आज सकाळी निघाली होती. ही बस नगर कल्याण मार्गाने जात असतांना ढवळगाव येथे भरधाव वेगात असणाऱ्या एका इर्टिगा कारने एका वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी समोरून येणाऱ्या एसटी बसला ही कार धडली. हा अपघात ऐवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा यात चक्काचूर झाला. या अपघातात दोघांचा जागेवरच तर दोघांचा रुग्णालयात उपचार सुरू असतांना मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना देत बचाव कार्य राबवण्यास जखमी आणि मृत नागरिकांना तातडीने वाहनातून बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी मोठा आक्रोश सुरू होता. मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने आणि अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी देखील तातडीने घटनास्थळी येत जखमी नागरिकांना रुग्णवाहिकेच्या साह्याने दवाखान्यात दाखल केले. दरम्यान, बस मधून १६ प्रवासी प्रवास करत होते. हे सर्व प्रवासी सुखरूप आहेत. अपघातात कारचा चुराडा झाला आहे. एसटी बसच्या समोरच्या भागाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

IPL_Entry_Point