Viral News : विमानतळावर प्रवाशाच्या पँटमध्ये सुरू होती चुळबुळ! पोलिसांनी अटक करून तपासले असता निघाले साप-man hide snakes in pants at airport caught miami viral news ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : विमानतळावर प्रवाशाच्या पँटमध्ये सुरू होती चुळबुळ! पोलिसांनी अटक करून तपासले असता निघाले साप

Viral News : विमानतळावर प्रवाशाच्या पँटमध्ये सुरू होती चुळबुळ! पोलिसांनी अटक करून तपासले असता निघाले साप

May 05, 2024 10:32 AM IST

man hide snakes in pants : अमेरिकेच्या मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पोलिस अधिकारी आश्चर्यचकित झाले. एका प्रवाशाची तपासणी केली असता, त्याच्या पँटमध्ये दोन जिवंत साप आढळले.

विमानतळावर प्रवाशाच्या पँटमध्ये सुरू होती चुळबुळ! पोलिसांनी अटक करून तपासले असता निघाले साप
विमानतळावर प्रवाशाच्या पँटमध्ये सुरू होती चुळबुळ! पोलिसांनी अटक करून तपासले असता निघाले साप

man hide snakes in pants : अमेरिकेच्या मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पोलिस अधिकारी आश्चर्यचकित झाले. एका तस्कराने दोन साप त्याच्या पॅन्टमध्ये लपवले होते. हा प्रवासी विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेतून जात असतांना त्याच्या पॅन्टमध्ये काही तरी चुळबुळ सुरू असल्याचे अधिकाऱ्यांना जाणवले. त्याला तपासणीसाठी बाजूला केले असता, त्याच्या पॅन्टमध्ये हे साप आढळले. या व्यक्तीला सापांची तस्करी केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ भीषण अपघात, तिघे ठार, दोघे जखमी

अमेरिकेतील मियामी येथील विमानतळावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात. या विमान तळावर एकाने सापांची तस्करी केली. या प्रवाशाने हे साप त्यांच्या पॅन्टच्या अंन्डरवेअरमध्ये लपवले होते. पोलिसांनी त्याची तपासणी केल्यावर त्यांना धक्काच बसला. पँटमध्ये एका पिशवीत त्याने हे साप लपवले होते.

यूएस ट्रान्सपोर्टेशन सिक्युरिटी ॲडमिनिस्ट्रेशन (TSA) ने ट्विटरवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांना २६ एप्रिल रोजी एका चेकपॉईंटवर प्रवाश्यांच्या पँटमध्ये सापांनी भरलेली एक पिशवी सापडली.

Ahmednagar accident : अहमदनगरमध्ये ओव्हरटेक करण्याच्या नादात एसटी-कारचा भीषण अपघात; ४ ठार, ३ जखमी

माहितीसोबतच अधिकाऱ्यांनी या घटनेची छायाचित्रेही सोशल मीडियावर टाकली आहेत. ज्यामध्ये त्या व्यक्तीने त्याच्या पॅन्टमध्ये लपवलेल्या पिशवीतून दोन छोटे पांढऱ्या रंगाचे साप सापडले. हे साप फ्लोरिडा वन्यजीव संरक्षण आयोगाकडे सोपवण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर या व्यक्तीच्या चौकशीसाठी त्याला अटक करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis : 'फडणवीसांविरोधात रचण्यात आल होता मोठा कट'; 'या' नेत्याच्या ट्विटमुळे खळबळ, लवकरच करणार गौप्यस्फोट

मियामी विमानतळावर बाहेर पडताना हा व्यक्ती विचित्र वागत होता. त्याच्या पॅन्टमध्ये काहीतरी हालचाल होत असतांना पोलिस अधिकाऱ्यांना दिसले. त्यांचा संशय बाळवल्याने त्याला बाजूला घेत त्याला तयाची पॅन्ट काढायला लावण्यात आली. यावेळी त्याच्या पँटमध्ये लपवलेल्या पिशवीतून दोन जीवंत साप बाहेर आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला अटक केली.

सोशल मिडीयावर घटना व्हायरल

ही घटना सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. अनेक नेटकऱ्यांनी यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी त्याच्या बुद्धीचे कौतुक केले आहे तर काही जणांनी त्याला मूर्ख म्हटले आहे. साप जर त्याला चावले असते तर त्याच्या जिवावर बेतले असते अशी प्रतिक्रिया काही जणांनी दिली आहे.