मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune vishrantwadi murder : भांडणे सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला! पुण्यातील विश्रांतवाडी येथील घटना

Pune vishrantwadi murder : भांडणे सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला! पुण्यातील विश्रांतवाडी येथील घटना

May 05, 2024, 07:07 AM IST

    • Pune vishrantwadi murder : पुण्यात विश्रांतवाडी येथे शेजारी सुरू असलेल्या दोघांच्या भांडणात पडणे एकाच्या जिवावर बेतले आहे. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला जबर मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
भांडणे सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला! पुण्यातील विश्रांतवाडी येथील घटना

Pune vishrantwadi murder : पुण्यात विश्रांतवाडी येथे शेजारी सुरू असलेल्या दोघांच्या भांडणात पडणे एकाच्या जिवावर बेतले आहे. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला जबर मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

    • Pune vishrantwadi murder : पुण्यात विश्रांतवाडी येथे शेजारी सुरू असलेल्या दोघांच्या भांडणात पडणे एकाच्या जिवावर बेतले आहे. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला जबर मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Pune vishrantwadi murder : पुण्यात खून, दरोडे, मारामारी या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. विश्रांतवाडी येथे एका शेजारी राहणाऱ्या नवरा बायकोच्या भांडणात पडणे एकाच्या जिवावर बेतले आहे. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला गंभीर मारहाण करण्यात आली. यात मारहाण झालेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना विश्रांतवाडी येथील धानोरी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री घडली.

ट्रेंडिंग न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्यात पुढील ३ दिवस पावसाचे! पावसाचा यलो अलर्ट; ‘येथे’ उष्णतेच्या लाटेचा इशारा

प्रशांत नारायण शिंदे (वय ४५, रा. माधवनगर, धानोरी, विश्रांतवाडी) असे खून झालेल्याचे व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अभय शेलार (वय ३३, रा. मुळा रस्ता, आदर्शनगर, खडकी) याच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी याबाबत विनोद नारायण शिंदे (वय ४३) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Raj Thackeray : नारायण राणेंच्या प्रचार सभेतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, विचारला थेट सवाल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अभय शेलार व खून झालेले प्रशांत शिंदे शेजारी राहतात. शुक्रवारी रात्री अभयच्या आई-वडीलांचा वाद सुरू होता. त्याची आई प्रशांतच्या घरी आली. माझा नवरा वाद घालतो. त्याला समजावून सांगा, असे तिने प्रशांतला सांगितले. शेजऱ्याला समजवण्यासाठी प्रशांत हा अभयच्या घरी गेला. प्रशांतने त्याच्या वडिलांना समजावून सांगण्याच्या प्रयत्न केला. यावेळी प्रशांतने मद्यपान केले होते. दारूच्या नशेत त्याने अभयच्या वडिलांना शिवीगाळ केली. ही बाब वडीलांकडून अभयला कळली. याचा राग आल्याने अभयने रात्री साडेदहाच्या सुमारास त्याचे मित्र मित्र निखिल, अभिजीत, सुमित यांना घेऊन प्रशांतच्या घरी गेले. यावेळी त्यांनी प्रशांतला जोरदार मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत प्रशांत हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र, मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने उपचाराधीच प्रशांतचा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. आरोपी अभय व त्याचे मित्र फरार झाले होते. पोलिसांनी पथक तयार करून सर्व आरोपींना अटक केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तानावाचे वातावरण आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन खंदारे पुढील तपास करत आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या