Raj Thackeray : नारायण राणेंच्या प्रचार सभेतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, विचारला थेट सवाल-mns raj thackeray target uddhav thackeray in narayan rane loksabha election campaign rally in kankavali ,निवडणुका बातम्या
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Raj Thackeray : नारायण राणेंच्या प्रचार सभेतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, विचारला थेट सवाल

Raj Thackeray : नारायण राणेंच्या प्रचार सभेतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, विचारला थेट सवाल

May 04, 2024 11:43 PM IST

Raj thackeray On Uddhav Thackeray : मागील १० वर्षापैकी साडे सात वर्षे तुम्ही सत्तेत होता. तसेच अडीच वर्ष मुख्यमंत्री होता. मग राज्यातील उद्योगधंदे बाहेर जाताना विरोध का केला नाही? असा थेट सवाल राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना केला. राज ठाकरेंनी नारायण राणेंच्या प्रचारार्थ कणकवलीत सभा घेतली.

राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, विचारला थेट सवाल
राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, विचारला थेट सवाल

Raj Thackeray rally in kankavali : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीचे उमेदवार नारायण राणे (Narayan rane) यांच्या प्रचारार्थ कणकवलीत सभा घेतली. आजच्या सभेतून राज ठाकरेंनी कोकणातील उद्योगधंदे, बारसू,नाणार प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. कोकणातील तसेच महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला पळवले जात असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी आपल्या सभेतून केली होती. त्यावरून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा व्यक्त केला होता. मात्र त्यांनी आजपर्यंत कोणासाठीही सभा घेतली नव्हती. पण आज कणकवलीत भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी राज ठाकरेंनी सभा घेत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. २० वर्षानंतर राणे व राज ठाकरे एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले.

राज ठाकरे म्हणाले की, कोकणातले उद्योग धंदे गुजरातला जात असल्याचे उद्धव ठाकरे म्हणतात. पण गेल्या १० वर्षापैकी साडे सात वर्षे तम्ही सत्तेत होते.२०१४ते२०१९तुम्हीसत्तेत बसला होता.२०२० ते २०२२तुम्ही मुख्यमंत्री होता.मग त्यावेळी उद्योगधंदे बाहेर जाताना विरोध का केला नाही.

राज म्हणाले, आज देशात उभी फूट पडली आहे. एक तर तुम्ही मोदींच्या बाजूने आहे नाहीतर विरोधात. मला मुख्यमंत्रिपद दिलं नाही म्हणून मी विरोधात गेलो नाही. काल कणकवलीत माजी मुख्यमंत्री ठाकरे येऊन गेले. उद्धव ठाकरे म्हणतात अडीच-अडीच वर्षाचा शब्द पाळला नाही म्हणून मी युतीतून बाहेर पडलो. ह्याचा अर्थ समजा भाजपाने अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिले असते तर हे मोदींविरोधात बोलले असते का? ह्याचा अर्थ सत्तेचा बोळा तोंडात कोंबला असता तर आज विरोधात नसते.

 

मोदी सरकारने ज्या घोषणा केल्या त्याचा मी विरोध केला. त्या गोष्टी आजही मला पटत नाहीत. मात्र ज्या गोष्टी पटल्या त्याचं मी जाहीरपणे कौतुक करत आहे. ज्या प्रकारे काश्मीरमधील कलम ३७० रद्द झालं आहे. हे केवळ नरेंद्र मोदी सरकारमुळं झालं आहे. यापूर्वी अनेकदा मागण्या झाल्या पण कुणीचं केलं नाही. पण नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ते करून दाखवलं. बाबरी मशिदीचा विषय आला,त्यावेळी आजच्याप्रमाणे न्यूज चॅनेल नव्हती फक्त दुरदर्शन होते. जे कारसेवक अयोध्येत गेले त्यांना गोळ्या झाडून ठार मारले त्यांची प्रेतं शरयू नदीत फेकली, ते चित्र अजूनही डोळ्या समोरून जात नाही. राम मंदिर तिथे उभं राहिलं, प्रतिष्ठापना झाली. जसं कश्मीरचं झालं, नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार झाली आहे. जे चांगलं आहे ते चांगले आहे.