मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Assembly Session : विरोधकांचं कामकाज आज विधानभवनाच्या पायऱ्यांवरच, प्रतिसभागृह भरवले!

Maharashtra Assembly Session : विरोधकांचं कामकाज आज विधानभवनाच्या पायऱ्यांवरच, प्रतिसभागृह भरवले!

Dec 23, 2022, 12:51 PM IST

  • Maharashtra Assembly Winter Session : सरकारच्या दडपशाहीचा निषेध करत विरोधी पक्षांच्या आमदारांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवरच ठाण मांडलं आहे.

Maharashtra Assembly Winter Session

Maharashtra Assembly Winter Session : सरकारच्या दडपशाहीचा निषेध करत विरोधी पक्षांच्या आमदारांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवरच ठाण मांडलं आहे.

  • Maharashtra Assembly Winter Session : सरकारच्या दडपशाहीचा निषेध करत विरोधी पक्षांच्या आमदारांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवरच ठाण मांडलं आहे.

Maharashtra Assembly Winter Session : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होऊन पाच दिवस झाल्यानंतरही कामकाज सुरळीत होण्याची चिन्हं दिसत नाहीत. विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये असलेला तणाव वाढतच आहे. त्याची परिणती विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकण्यात झाली आहे. महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी आज दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकत विधानभवनाच्या पायऱ्यांवरच ठिय्या दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली संभाजीराजेंची माफी; म्हणाले “आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."

Mumbai Local : मुंबईच्या लोकलमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार; नशेखोर तरुणांकडून प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न, महापुरुषांच्या अवमानावरून विरोध आक्रमक असतानाच नागपूर येथील एका भूखंड वाटपाचं प्रकरण समोर आलं. त्यात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संबंध असल्यानं विरोधकांनी त्यांना लक्ष्य केलं. त्यास उत्तर म्हणून भाजपच्या आमदारांनी दिशा सालियन प्रकरण पुढं केलं. त्यावरून मोठा गदारोळ झाला व तणाव वाढत गेला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांच्या निलंबनामुळं त्यात भर पडली. सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करू देत नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं म्हणत विरोधी आमदारांनी आजच्या कामकाजावर बहिष्कार घातला आहे. जयंत पाटील यांच्या निलंबनाचा निर्णय मागे घ्यावा, अशी विरोधकांची मागणी आहे. मात्र, सरकार त्यास प्रतिसाद देत नसल्यामुळं विधानसभेचं कामकाज ठप्प झालं आहे.

विधान भवनाच्या पायऱ्यावर ठाण मांडून बसलेल्या विरोधी पक्षाच्या आमदारांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मार्गदर्शन केलं. सीमाप्रश्नावर सर्वजण तिथल्या मराठी बांधवांसोबत उभे आहेत असा संदेश देण्यासाठी सरकारनं दोन्ही सभागृहात एकमतानं ठराव मंजूर करायला हवा. सोमवारी तो ठराव कोणत्याही परिस्थितीत घेण्यास भाग पाडू, असं अजित पवार म्हणाले. विधानसभा सदस्य म्हणून आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहून कामकाज थांबवायला हवं होतं, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड यांनी भाषणं करत सरकारवर हल्ला चढवला.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा