मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut : ‘चिनी एजंट’ म्हणणाऱ्या बोम्मईंना संजय राऊतांचे चोख प्रत्त्युतर; म्हणाले...

Sanjay Raut : ‘चिनी एजंट’ म्हणणाऱ्या बोम्मईंना संजय राऊतांचे चोख प्रत्त्युतर; म्हणाले...

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 23, 2022 11:24 AM IST

Sanjay Raut : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या विरोधात मांडलेला ठराव कर्नाटकच्या विधानसभेने काल एकमताने मंजूर केला. यावेळी बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली होती. बोम्मई यांच्या टिकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Sanjay Raut
Sanjay Raut (HT)

दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद भडकवणाऱ्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले. बोम्मई यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या विरोधात मांडलेला ठराव कर्नाटकच्या विधानसभेने एकमताने मंजूर केला आहे. महाराष्ट्राला एक इंचही जागा न देण्याचा ठराव मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल मांडला होता. तसेच सीमाप्रश्नाच्या विरोधात मांडलेल्या ठरावावेळी बोलताना बोम्मई यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. संजय राऊत देशद्रोही असून ते चीनचे एजंट असल्याचे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले होते. या टीकेला संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.

दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना संजय राऊत म्हणाले, चीनने भारतात खुसखोरी केली आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक महाराष्ट्रात घुसघोरी करत असून आम्हालाही तोच मार्ग अवलंबावा लागेल. जर बोम्मईंना चीनचा इतकाच तिटकारा असेल, तर आधी त्यांनी त्यांच्या पंतप्रधानांचा निषेध करावा. मोदींनीच चीनसाठी दरवाजे उघडले आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक वादात तेल ओतण्याचे काम बोम्मई करत आहेत. अमित शहांबरोबरच्या बैठकीत जे ठरलं होतं, ते मानायला बोम्मई तयारी नाहीत आणि आज ते आमचे संस्कार आणि संस्कृती काढत आहे. आम्हाला त्यांनी संस्कृती आणि संस्कार सांगण्याची गरज नाही.  आज बोम्मईंची जीभ चालते आहे, कारण शिंदे फडणवीस गप्प आहेत. महाराष्ट्र कर्नाटक वाद बोम्मईंना त्यांच्या राजकीय फायद्यासाठी निर्माण केला आहे. आम्ही चीनचे एजंट असेल, तर तुम्ही कोणाचे एजंट आहात? जर तुम्हाला बोलायचा घटनात्मक अधिकार आहे, तर आम्हालाही सीमावासियांच्या हक्काबाबत बोलण्याचा घटनात्मक अधिकार आहे. महाराष्ट्रवर तुम्ही हक्क सांगता त्याला विरोध करण्याचा घटनात्मक अधिकार आम्हाला आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग