मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit pawar : कोर्टाचा निकाल लागू द्या, एक इंचही जमीन कर्नाटकात ठेवणार नाही; अजित पवारांचा थेट इशारा

Ajit pawar : कोर्टाचा निकाल लागू द्या, एक इंचही जमीन कर्नाटकात ठेवणार नाही; अजित पवारांचा थेट इशारा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 23, 2022 01:04 PM IST

Ajit pawar on Karnatk border issue : कर्नाटक विधानसभेमध्ये सीमावादाचा निषेध करणारा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. कर्नाटकच्या या भूमिकेचा निषेध राज्यातील विरोधकांनी करत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar

नागपूर : 'आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. पण राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कचखाऊ भूमिका का घेतात हे कळायला अर्थ नाही. आम्ही मुंबईत झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सांगतिलं होतं, आणि त्यांनीही मराठी भाषिकांना दिलासा देण्यासाठी, मदत करण्यासाठी तसा संदेश देण्याची गरज आहे. हे त्यांनी देखील मान्य केले होते. मात्र, सरकार काहीच भूमिका घेत नाही. सध्या हे प्रकरण कोर्टात आहे. कोर्टाचा निर्णय येऊ द्या, एक इंचही जमीन कर्नाटकात ठेवणार नाही असा इशारा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद भडकवणाऱ्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले. बोम्मई यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या विरोधात मांडलेला ठराव कर्नाटकच्या विधानसभेने एकमताने मंजूर केला आहे. महाराष्ट्राला एक इंचही जागा न देण्याचा ठराव मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल मांडला होता. बोम्मई यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील विरोधीपक्ष हे संतप्त झाले आहेत. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील कर्नाटकच्या या भूमिकेवर सरकार काहीच करत नसल्याने टीका करत हल्ला चढवला.

काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले होते. या निषेधार्थ सर्व विरोधी पक्ष विधानसभेच्या पायऱ्यांवर जमत त्यांनी सरकारविरोधात निदर्शने करत टीका केली. यावेळी अजित पवार मध्यमांशी बोलतांना म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्याप्रमाणे आक्रमकपणे त्यांची बाजू मांडताना दिसत आहेत तसे आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का मांडत नाहीत हा प्रश्न आम्हाला पडला आहे. याचं उत्तर त्यांच्याकडून आलं पाहिजे. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणत आहेत की महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. एकदा याचा निकाल लागू द्या गावे काय एक एक इंच जमीन कर्नाटकातून पुन्हा आम्ही राज्यात सहभागी करून घेऊ असे उत्तर देखील अजित पवार यांनी बोम्मई यांना दिले आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग