मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mankhurd Crime News : मानखुर्दमध्ये धारदार शस्त्रांनी वार करून तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक

Mankhurd Crime News : मानखुर्दमध्ये धारदार शस्त्रांनी वार करून तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक

Sep 29, 2022, 09:03 AM IST

    • Mankhurd Crime News : किरकोळ कारणावरून मुंबईतील मानखुर्दमध्ये तरुणाची हत्या करण्यात आल्यानं शहरात खळबळ उडाली आहे.
Maharashtra Crime News (HT_PRINT)

Mankhurd Crime News : किरकोळ कारणावरून मुंबईतील मानखुर्दमध्ये तरुणाची हत्या करण्यात आल्यानं शहरात खळबळ उडाली आहे.

    • Mankhurd Crime News : किरकोळ कारणावरून मुंबईतील मानखुर्दमध्ये तरुणाची हत्या करण्यात आल्यानं शहरात खळबळ उडाली आहे.

Mankhurd Mumbai Crime News : नालासोपाऱ्यात घडलेली हत्येची घटना ताजी असतानाच आता मुंबईतील मानखुर्दमध्ये एका तरुणावर धारदार शस्त्रानं वार करत त्याची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळं या घटनेनं शहरात खळबळ उडाली असून आता पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी कारवाई करत दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune–Bengaluru highway : पुणे-बेगळुरू हायवेवरील वाहतूक ठप्प; पुणे व कोल्हापूरच्या दरम्यान वाहनांची १५ किमीची रांग

Indian railway: पुणेकरांसाठी खुशखबर! प्रभू रामाच्या दर्शनासाठी पुणे ते अयोध्या धावणार समर स्पेशल ट्रेन्स, वाचा वेळापत्रक

Viral News : शंभर किलो वजनाचा पुणेकर आंब्याच्या झाडावर चढला, तिथेच बेशुद्ध पडला; पुढे काय झाले? वाचा!

Maharashtra Weather Update: मुंबई, पुणे, रायगडसह 'या' जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट! घराबाहेर पडतांना काळजी घ्या

मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्दमध्ये आरोपी आणि मयत तरुण यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर शिवीगाळ झाल्यानं प्रकरण आणखी वाढलं. त्यामुळं संतापलेल्या आरोपींनी तरुणावर धारदार शस्त्रानं वार करत त्याची हत्या केली. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. तरुणाच्या नातेवाईकांना या घटनेबाबत कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून तरुणाला रुग्णालयात दाखल केलं. परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर आता मयत तरुणाच्या भावानं पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानखुर्दमध्ये काही अज्ञात लोकांनी किरकोळ कारणावरून एका तरुणाची हत्या केल्याची माहिती आहे. याबाबत मयताच्या भावानं फिर्याद दिली असून दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास केला जात आहे. ही हत्या का करण्यात आली, यामागे नेमकं काय कारण आहे, हे तपास केल्यानंतरच समोर येईल.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा