मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shiv Sena : स्वत:च्या मुलाला सोडून दुसऱ्याच्या बाळाला पोसलं जातंय; किशोरी पेडणेकरांचा भाजपला टोला
Shiv Sena vs BJP On Pankaja Mundes Statement On PM Modi
Shiv Sena vs BJP On Pankaja Mundes Statement On PM Modi (HT)

Shiv Sena : स्वत:च्या मुलाला सोडून दुसऱ्याच्या बाळाला पोसलं जातंय; किशोरी पेडणेकरांचा भाजपला टोला

28 September 2022, 16:25 ISTAtik Sikandar Shaikh

Shiv Sena vs BJP : भाजप नेत्या पंकजा मुंडेंना सातत्यानं डावलण्यात येत असल्यानं त्यांनी स्वत:ची खदखद बोलून दाखवल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

Shiv Sena vs BJP On Pankaja Mundes Statement On PM Modi : राज्यात सत्ताबदल झाल्यापासून शिवसेना आणि शिंदे गटात सातत्यानं संघर्ष होत आहे. याशिवाय शिवसेनेनं आता भारतीय जनता पक्षावरही कठोर शब्दांत टीका करायला सुरुवात केली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्यानं आता विरोधकांनी भाजपवर टीका करायला सुरुवात केली आहे. त्यातच आता मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी पंकजा मुंडेंचं कौतुक करत भाजपवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

माध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, पंकजा मुंडे या कार्यशील आणि स्पष्ट बोलणाऱ्या महिला आहेत. भाजपमध्ये त्यांच्यावर अन्याय होत असून त्यांनी त्यांची खदखद बोलून दाखवली आहे. कारण सध्या भाजपमध्ये स्वत:च्या बाळाला बाजूला ठेऊन दुसऱ्याचं बाळ पोसण्याचा ट्रेंड सुरू झाला असल्याचं सांगत भाजपला टोला लगावला आहे.

पंकजा मुंडेंवर मी बोलणं योग्य होणार नाही, कारण त्यांच्या जन्मापासूनच त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे आणि काका पंडिराव मुंडे हे राजकारणात मुरलेले नेते होते. त्यांनी गोपीनाथ मुडेंकडून राजकारणाचं बाळकडू घेतलेलं आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

दरम्यान आता पंकजा मुंडेंनी केलेल्या वक्तव्याला राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी पाठिंबा दिला आहे. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी पंकजा मुंडेंना पाठिंबा देताना भाजपवर सडकून टीका केली आहे. त्यानंतर आता शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी देखील भाजपवर टीका केल्यानं यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रंगत असल्याचं पाहायला मिळत आहे.