मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral News : शंभर किलो वजनाचा पुणेकर आंब्याच्या झाडावर चढला, तिथेच बेशुद्ध पडला; पुढे काय झाले? वाचा!

Viral News : शंभर किलो वजनाचा पुणेकर आंब्याच्या झाडावर चढला, तिथेच बेशुद्ध पडला; पुढे काय झाले? वाचा!

May 01, 2024, 09:06 AM IST

  • Pune viral News : पुण्यात एक व्यक्ति तब्बल १०० फुट उंच असलेल्या आंब्याच्या झाडावर चढला. मात्र, हा व्यक्ति झाडावरच बेशुद्ध पडला. सुदैवाने तो झाडाच्या फांद्यांमध्ये अडकला. ही घटना अग्निशामक दलाला कळल्यावर त्यांनी तातडीने बचाव कार्य राबवून या व्यक्तीला वाचवले.

शंभर किलोचा पुणेकर आंब्याच्या झाडावर चढला, तिथेच बेशुद्ध पडला, अग्निशामक दलाच्या जवानांनी खाली आणले

Pune viral News : पुण्यात एक व्यक्ति तब्बल १०० फुट उंच असलेल्या आंब्याच्या झाडावर चढला. मात्र, हा व्यक्ति झाडावरच बेशुद्ध पडला. सुदैवाने तो झाडाच्या फांद्यांमध्ये अडकला. ही घटना अग्निशामक दलाला कळल्यावर त्यांनी तातडीने बचाव कार्य राबवून या व्यक्तीला वाचवले.

  • Pune viral News : पुण्यात एक व्यक्ति तब्बल १०० फुट उंच असलेल्या आंब्याच्या झाडावर चढला. मात्र, हा व्यक्ति झाडावरच बेशुद्ध पडला. सुदैवाने तो झाडाच्या फांद्यांमध्ये अडकला. ही घटना अग्निशामक दलाला कळल्यावर त्यांनी तातडीने बचाव कार्य राबवून या व्यक्तीला वाचवले.

Pune viral News : पुण्यात मोठ्या प्रमाणात आंब्याची झाडे आहेत. या सध्या हंगाम असल्याने ही झाडे आंब्यांनी लगडली आहेत. हे आंबे तोडून खाण्याचा मोह अनेकांना होतो. मंगळवारी असाच एक १०० किलोचा व्यक्ति १०० फुट उंच असलेल्या आंब्याच्या झाडावर आंबे तोडण्यासाठी चढला. मात्र, अचानक तो झाडावरच बेशुद्ध पडला. सुदैवाने हा व्यक्ति झाडांच्या फांद्यांमध्ये अडकला. दरम्यान, ही बाब झाडांखालून जणाऱ्यांना निदर्शनास आली. एक व्यक्ति बेशुद्ध अवस्थेत झाडावर अडकून पडला असल्याने त्यांनी ही बाब अग्निशामक दलाला कळवली. अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी येत त्यांनी या बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढले. ही घटना मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास घडली.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Accident : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गु्न्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या बिल्डर विशाल अग्रवालला अखेर अटक

Jayant patil : “लढाई संपलेली नाही, तर आता..’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

Mumbai-Pune Trains: मुंबई ते पुणे गाड्या रद्द, २८ मे ते २ जूनपर्यंत 'या' गाड्या धावणार नाहीत, वाचा संपूर्ण यादी

Mumbai Lok Sabha : वरळीत पोलिंग बूथवर काम करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू

Mallikarjun Kharge:फक्त मुस्लिमानांच जास्त मुले असतात का? मला देखील ५ मुलं आहेत! मल्लिकार्जुन खरगेंचं मोदींना उत्तर

कोथरूड येथे दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास कोथरुडच्या अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला एक इसम आंब्याच्या झाडावर बेशुद्ध अवस्थेत अडकून असल्याचा फोन आला. कोथरुडच्या पौड रोड भागात कृष्णा हॉस्पिटलजवळ एका इमारतीच्या मागच्या बाजूला झाडावर हा इसम अडकला होता. ही माहिती मिळताच अग्रिशमन दलाची गाडी आणि रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी दाखल झाली.

झारखंडमध्ये सूर्य देवाचा प्रकोप! तापमान पोहोचले ४७ अंश सेल्सिअसवर, २ बेशुद्ध, एकाचा मृत्यू, हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना एक व्यक्ति हा उंच आंब्याच्या झाडावर तीन फांद्याच्या मधोमध अडकलेल्या स्थितीत आढळला. घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच जवानांनी दलाकडील शिडी झाडाला लावून झाडावर चढले. त्यांनी या व्यक्तीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता तो बेशुद्ध अवस्थेत असल्याचे आढळले. जवानांनी तातडीने रश्शी, दोर याचा वापर करुन रेस्क्यु बेल्टच्या साह्याने तसेच त्याचे वजन अंदाजे शंभर किलोच्या आसपास असल्याने विषेश गाठीचा उपयोग करुन त्याव्यक्तीला हळूहळू व कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेत सुमारे ३० मिनिटात झाडावरुन खाली उतरवले. यानंतर त्याला तातडीने अँब्युलंस मधून रुग्णालयात उपचाराकरिता रवाना करण्यात आले.

ही कामगिरीत अग्निशमन अधिकारी गजानन पाथ्रुडकर, तांडेल आंगद लिपाणे, वाहनचालक महेश शिळीमकर, शरद गोडसे, फायरमन रोशन हरड, वैभव आवरगंड, रविंद्र बडे, प्रतीक पागसे, मारुती देवकुळे, कृष्णा नरवटे, महेश घुले, सुबोध भुतकर, परेश जाधव यांनी सहभाग घेतला.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या