मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Bengaluru highway : पुणे-बेगळुरू हायवेवरील वाहतूक ठप्प; पुणे व कोल्हापूरच्या दरम्यान वाहनांची १५ किमीची रांग

Pune Bengaluru highway : पुणे-बेगळुरू हायवेवरील वाहतूक ठप्प; पुणे व कोल्हापूरच्या दरम्यान वाहनांची १५ किमीची रांग

May 01, 2024, 12:20 PM IST

  • Pune Bangalore Highway traffic : पुणे-बंगळुरू मार्गावर कराड येथे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. याचा परिणाम या मार्गावरील वाहतुकीवर झाला आहे. तब्बल १५ किमी पर्यंतवाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यात अनेक वाहने अडकून पडली आहे.

पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहतूककोंडी; १५ किमीच्या रांगा; पुणे-कोल्हापूर दरम्यान वाहतूक झाली ठप्प

Pune Bangalore Highway traffic : पुणे-बंगळुरू मार्गावर कराड येथे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. याचा परिणाम या मार्गावरील वाहतुकीवर झाला आहे. तब्बल १५ किमी पर्यंतवाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यात अनेक वाहने अडकून पडली आहे.

  • Pune Bangalore Highway traffic : पुणे-बंगळुरू मार्गावर कराड येथे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. याचा परिणाम या मार्गावरील वाहतुकीवर झाला आहे. तब्बल १५ किमी पर्यंतवाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यात अनेक वाहने अडकून पडली आहे.

Pune Bangalore Highway traffic jam : पुणे-बंगळुरू महामार्गावर कराडजवळ मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे पुण्याहून कोल्हापूरला जाणारी वाहतूक संथ गतीने होत आहे. गेल्या चार-पाच तासांपासून इथे ट्रॅफिक जॅम झाले आहे. दोन्ही बाजूंनी सुमारे १५ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यचा परिमाण या मार्गाच्या वाहतुकीवर झाला आहे. एकीकडे उन्हाच्या झळा त्यात वाहतूक कोंडीत अडकल्याने नागरिक बेजार झाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Car accident: पप्पांनीच मला गाडी दिली, मी दारूही पितो! पोरशे कार अपघातातील आरोपी मुलांची धक्कादायक कबुली

HSC Result 2024 Live : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी!

Navi Mumbai: मॉरेशियन नागरिकाची दगडाने ठेचून हत्या; २० वर्षीय तरुणासह दोन अल्पवयीन मुलींना अटक, परिसरात खळबळ

Pune Metro : मेट्रोने आणली भन्नाट योजना! केवळ शंभर रुपयांत करा पुणे दर्शन! असा घ्या लाभ

Indian railway: पुणेकरांसाठी खुशखबर! प्रभू रामाच्या दर्शनासाठी पुणे ते अयोध्या धावणार समर स्पेशल ट्रेन्स, वाचा वेळापत्रक

आज एक मे असल्याने अनेकांना सुट्ट्या आहेत. त्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी देखील सुरू आहे. या मुळे कराड येथील पुणे-बंगळुरू मार्ग परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे. ही वाहतूक गेल्या तीन ते चार तासांपासून संथ गतीने सुरू आहे. अनेक मोठी वाहने या कोंडीत अडकून पडली आहे. तर काही प्रवासी गाड्या देखील यात अडकून पडल्या आहेत. परिमाणी या मार्गावरील वाहतूक ही संथ गतीने पुढे जात आहे.

Maharashtra Weather Update: मुंबई, पुणे, रायगडसह 'या' जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट! घराबाहेर पडतांना काळजी घ्या

पुणे-बंगळुरू हा राज्यातील सर्वात व्यस्त महामार्ग आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि मालाची वाहतूक होत असते. आज सकाळ पासून या मार्गावर वाहतूक ही हळू हळू पुढे जात आहे. बेशिस्त वाहने, नियम न पाळणारे चालक यामुले वाहतूक कोंडीत भर पडली आहे.

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

अनेक नागरिक पडले अडकून

सुट्टी असल्याने अनेक नागरिक आज घराबाहेर पडले. काही चाकारमानी हे मुंबईहून कोल्हापूर, सातारा येथे जाण्यासाठी निघाले. मात्र, हे प्रवासी या वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय झाली आहे. वाहतूक पोलिस सध्या येथील वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, गेल्या चार ते पाच तासांपासून या मार्गावरील वाहतूक कोंडी ही कायम आहे.

१५ किमी च्या लागल्या रांगा

या मार्गावर वाहतूक कोंडीमुळे दोन्ही बाजूकडून तब्बल १५ किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. आज पुण्यात आणि परिसरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. एकीकडे सूर्य आग ओकत असतांना नागरिक या वाहतूक कोंडीत सापडल्याने त्यांची गैरसोय झाली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या