मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Jammu Kashmir : पेट्रोल पंपावर उभी असलेल्या बसमध्ये भीषण बॉम्बस्फोट, पाहा हादरवून टाकणारा व्हिडिओ

Jammu Kashmir : पेट्रोल पंपावर उभी असलेल्या बसमध्ये भीषण बॉम्बस्फोट, पाहा हादरवून टाकणारा व्हिडिओ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 29, 2022 08:41 AM IST

Bomb Blast In Jammu Kashmir : गेल्या आठ तासांत जम्मू-काश्मिरमध्ये झालेला हा दुसरा मोठा बॉम्बस्फोट आहे. त्यामुळं आता या बॉम्बस्फोटांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

Bomb Blast In Udhampur Jammu Kashmir
Bomb Blast In Udhampur Jammu Kashmir (HT)

Bomb Blast In Udhampur Jammu Kashmir : गेल्या आठ तासांत जम्मू काश्मिरमध्ये दोन मोठे बॉम्बस्फोट झाल्यानं खळबळ उडाली आहे. आता उधमपूरमध्ये एका पेट्रोलपंपावर उभी असलेल्या बसमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. सुदैवानं त्यावेळी बसमध्ये कुणीही नव्हतं. त्यामुळं या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली आहे.

या घटनेची माहिती मिळताच उधमपूर पोलीस आणि तपास यंत्रणांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली असून हा प्रकार नेमका कसा घडला किंवा यामागे कुणाचा हात आहे का, हे तपासलं जात आहे. बॉम्बस्फोटाची ही सर्व घटना पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचा एक व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे. त्यात कशा प्रकारे हा बॉम्बस्फोट झाला, हे स्पष्ट दिसतंय.

अपघात की कट?

बसमध्ये झालेल्या स्फोटाची ही घटना अपघात आहे की यामागे अतिरेक्यांची कट रचलेला आहे, याची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. गेल्या आठ तासांत जम्मू-काश्मिरमध्ये घडलेला हा दुसरा बॉम्बस्फोट आहे. त्यामुळं तपास यंत्रणांनी या प्रकरणांची चौकशी करायला सुरुवात केली आहे.

IPL_Entry_Point