मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  van vibhag bharti 2023 : वनविभागात तब्बल ९६४० पदांची मेगाभरती; बारावी पास असाल तर तयारीला लागा

van vibhag bharti 2023 : वनविभागात तब्बल ९६४० पदांची मेगाभरती; बारावी पास असाल तर तयारीला लागा

Feb 05, 2023, 10:36 PM IST

  • maharashtra forest department recruitment 2023 : सरकारी नोकरी शोधणाऱ्यांनी कागदपत्रं एकत्र गोळा करत अभ्यासाला लागण्याची गरज आहे. कारण आता वनविभागात बंपर भरती निघाली आहे.

Forest Recruitment 2023 Maharashtra (HT)

maharashtra forest department recruitment 2023 : सरकारी नोकरी शोधणाऱ्यांनी कागदपत्रं एकत्र गोळा करत अभ्यासाला लागण्याची गरज आहे. कारण आता वनविभागात बंपर भरती निघाली आहे.

  • maharashtra forest department recruitment 2023 : सरकारी नोकरी शोधणाऱ्यांनी कागदपत्रं एकत्र गोळा करत अभ्यासाला लागण्याची गरज आहे. कारण आता वनविभागात बंपर भरती निघाली आहे.

Forest Recruitment 2023 Maharashtra : वित्त, गृह आणि सामान्य प्रशासन विभागात शिंदे-फडणवीस सरकारनं मोठी पदभरती काढल्यानंतर आता वनविभागात तब्बल ९६४० पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून येत्या काही दिवसांत पदांची जाहिरात निघण्याची शक्यता आहे. जीआरमध्ये गट क आणि ड क्षेणीतील पदांचा समावेश असून सरकारनं वनविभागाकडे रिक्त पदांचा तपशील मागवला आहे. त्यामुळं आता तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रं गोळा करत तातडीनं अभ्यासाला लागण्याची गरज आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीन, सेल्फी पॉईंटची सुविधा

Abhishek Ghosalkar : घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; घटनेचे सीसीटीव्ही फुटेज कुटुंबियांना दाखवा, हायकोर्टाचे आदेश

Mumbai News : नायर रुग्णालयाच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून कर्मचाऱ्याची आत्महत्या

vijay wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणी भाजप आक्रमक; विजय वडेट्टीवारांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

शासनानं जीआर प्रसिद्ध केल्यानंतर आता वनविभागाकडून येत्या काही दिवसांत ९६४० पदांची जाहिरात निघणार असून त्यात वनरक्षक पदांची संख्या मोठी असणार आहे. संबंधित पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं किमान बारावी पर्यंत शिक्षण झालेलं असणं गरजेचं आहे. वनरक्षक पदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांची लेखी आणि शारीरिक परिक्षा घेण्यात येणार असून त्याद्वारे निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना २० ते २५ हजार रुपयांपर्यंतचा पगार देण्यात येणार आहे. त्यामुळं आता चांगल्या पगाराची सरकारी पदभरती जाहिर झाल्यामुळं अनेकांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

वनरक्षक पदांसाठी अनुसूचित जाती-जमाती, माजी सैनिक, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले अथवा मरण पावलेल्यांचे वारस, वनखबरे आणि वनरक्षकांचे पाल्ये हे देखील या भरतीसाठी पात्र असणार आहे. परंतु या उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे. पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्ती मान्य करणाऱ्या उमेदवारांना भरतीप्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.