मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Loha Nanded : उकळतं पाणी अंगावर पडल्यानं चिमुकल्याचा मृत्यू; धक्कादायक घटनेनं नांदेडमध्ये शोककळा

Loha Nanded : उकळतं पाणी अंगावर पडल्यानं चिमुकल्याचा मृत्यू; धक्कादायक घटनेनं नांदेडमध्ये शोककळा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 05, 2023 04:58 PM IST

Loha Nanded News : थंडीपासून बचाव करण्यासाठी चिमुकला चुलीसमोर बसलेला होता. परंतु भांड्यातील उकळतं पाणी अंगावर पडल्यानं मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Loha Nanded News Today
Loha Nanded News Today (HT)

Loha Nanded News Today : थंडीपासून बचाव करण्यासाठी चुलीजवळ उब घेत असलेल्या चिमुकल्यावर चुलीवरील भांड्यातील गरम पाणी सांडल्यानं त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडच्या लोहा तालुक्यातील शिरढोणमध्ये ही घटना घडली असून त्यानंतर आता संपूर्ण नांदेड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. कार्तिक पांडुरंग शिंदे असं मृत चिमुकल्याचं नाव आहे. ऊसतोडीसाठी अनेक कुटुंब नांदेड जिल्ह्यात आली होती. शिरढोणमध्येही ऊसतोडीसाठी आलेल्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळं आता या घटनेमुळं हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरढोणमध्ये राहत असलेल्या ऊसतोड कामगारांमधील एका कुटुंबानं सकाळी दगडांच्या चुलीवर पाणी तापण्यास ठेवलेलं होतं. त्यावेळी कार्तिक पांडुरंग शिंदे नावाचा मुलगा उब घेण्यासाठी चुलीजवळ गेला. त्यावेळी पायाचा धक्का चुलीच्या दगडाला लागल्यानं चूल कोसळली आणि चुलीवरील उकळतं पाणी कार्तिच्या अंगावर पडलं. त्यावेळी कार्तिकनं आरडाओरडा केल्यानंतर फडातील लोकांसह त्याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी दाव घेत कार्तिकला तातडीनं नांदेडमधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता.

मयत कार्तिकचे वडील पांडुरंग सत्ताजी शिंदे हे गेल्या काही महिन्यांपासून पोटाची खळगी भरण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये ऊसतोड कामगार म्हणून काम करत आहे. त्यावेळी कुटुंबासह चिमुकली मुलंही त्यांनी सोबत घेतली होती. परंतु आता पाचवर्षीय लेकावर गरम पाणी सांडल्यानं त्याचा मृत्यू झाल्यामुळं शिंदे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

IPL_Entry_Point