मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  mahesh shinde vs Amol mitkari: महेश शिंदेंनी आई-बहिणीवरून शिवीगाळ केली; अमोल मिटकरींचा आरोप

mahesh shinde vs Amol mitkari: महेश शिंदेंनी आई-बहिणीवरून शिवीगाळ केली; अमोल मिटकरींचा आरोप

HT Marathi Desk HT Marathi

Aug 24, 2022, 12:33 PM IST

    • Amol Mitkari allegations on Mahesh Shinde: राज्यातील जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्याचे पवित्र व्यासपीठ असलेल्या विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज अतिशय विदारक आणि लज्जास्पद चित्र पहायला मिळाले.
CM Eknath Shinde supporter MLA thrash NCP MLA in Assembly complex

Amol Mitkari allegations on Mahesh Shinde: राज्यातील जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्याचे पवित्र व्यासपीठ असलेल्या विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज अतिशय विदारक आणि लज्जास्पद चित्र पहायला मिळाले.

    • Amol Mitkari allegations on Mahesh Shinde: राज्यातील जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्याचे पवित्र व्यासपीठ असलेल्या विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज अतिशय विदारक आणि लज्जास्पद चित्र पहायला मिळाले.

Amol Mitkari on Scuffle at Vidhan Bhavan: राज्यातील जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्याचे पवित्र व्यासपीठ असलेल्या विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज अतिशय विदारक आणि लज्जास्पद चित्र पहायला मिळाले. सत्ताधारी एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि विरोधी पक्षाचे आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकमेकांच्या अंगावर धावून आले. काहींनी धक्काबुक्की केली. 

ट्रेंडिंग न्यूज

बायकोसोबत फोनवर बोलताना आई मध्येच बोलली, संतापलेल्या मुलाने चाकूने वार करून केली हत्या

Pune Bengaluru highway : पुणे-बेगळुरू हायवेवरील वाहतूक ठप्प; पुणे व कोल्हापूरच्या दरम्यान वाहनांची १५ किमीची रांग

Indian railway: पुणेकरांसाठी खुशखबर! प्रभू रामाच्या दर्शनासाठी पुणे ते अयोध्या धावणार समर स्पेशल ट्रेन्स, वाचा वेळापत्रक

Viral News : शंभर किलो वजनाचा पुणेकर आंब्याच्या झाडावर चढला, तिथेच बेशुद्ध पडला; पुढे काय झाले? वाचा!

यादरम्यान शिंदे गटाचे सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी आई-बहिणीवरून शिवीगाळ केली असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. मिटकरी यांनी याविषयीची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असून शिवीगाळ करणाऱ्या आमदाराला समज द्यावी, अशी विनंती केली आहे.

अमोल मिटकरी म्हणाले की पावसाळी अधिवेशनात पहिल्या दिवसापासून विरोधी पक्षाचे आमदार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निदर्शन करत आहे. परंतु आज चक्क सत्ताधारी गटाचे आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर अवतरले. सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्यानंतर घोषणाबाजी सुरू झाली. यादरम्यान सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे एकदम आक्रमक झाल्याचे दिसले. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार अमोल मिटकरींच्या अंगावर धावून गेल्याचे दिसून आले. यादरम्यान महेश शिंदे यांनी आपल्याला आईबहिणीवरून शिवीगाळ केली असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला. सुरूवात ही त्यांनी केली. त्यांच्याकडून अशाप्रकारचं गैरवर्तन झालेलं आहे, असा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला.