मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kolhapur Crime News : बायकोसोबत फोनवर बोलताना आई मध्येच बोलली, संतापलेल्या मुलाने चाकूने वार करून केली हत्या

Kolhapur Crime News : बायकोसोबत फोनवर बोलताना आई मध्येच बोलली, संतापलेल्या मुलाने चाकूने वार करून केली हत्या

May 01, 2024, 01:15 PM IST

  • Kolhapur Crime News: कोल्हापूर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पती हा पत्नीशी फोनवर बोलत असतांना आई मध्येच बोलल्याने मुलाने आईचा चाकूने भोसकून खून केल्याने खळबळ उडाली आहे.

बायकोसोबत फोनवर बोलताना आई मध्येच बोलली, चाकूने वार करत मुलाने केली आईची हत्या

Kolhapur Crime News: कोल्हापूर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पती हा पत्नीशी फोनवर बोलत असतांना आई मध्येच बोलल्याने मुलाने आईचा चाकूने भोसकून खून केल्याने खळबळ उडाली आहे.

  • Kolhapur Crime News: कोल्हापूर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पती हा पत्नीशी फोनवर बोलत असतांना आई मध्येच बोलल्याने मुलाने आईचा चाकूने भोसकून खून केल्याने खळबळ उडाली आहे.

Kolhapur Crime News: कोल्हापूर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ कारणावरून एका मुलाने आईची चाकूने भोसकून हत्या केली. मुलगा हा बायको सोबत फोनवर बोलत असतांना आईमध्ये बोलल्याच्या राग आल्याने मुलाचा राग अनावर झाला. या रागाच्या भरात मुलाने आईवर चाकूने हल्ला करत तिच्या मानेवर, गळ्यावर, हातावर चाकूने हल्ला केला. यात आई ही गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटन कोल्हापूरच्या साळोखे पार्क परिसरात मंगळवारी घडली.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Car Accident : पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना पुणे पोलिस आयुक्तांचे खुले चॅलेंज! म्हणाले….

Latur News : कौटुंबिक कलहातून १४ वर्षांच्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल! क्लासच्या चवथ्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन

Khandala Accident: खंडाळा घाटात भीषण अपघात; कंटेनर- कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू, सहा जण जखमी

Viral Video : तरुणानं चक्क ८ वेळा मतदान केलं, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Pune Bengaluru highway : पुणे-बेगळुरू हायवेवरील वाहतूक ठप्प; पुणे व कोल्हापूरच्या दरम्यान वाहनांची १५ किमीची रांग

सादिक मुजावर असं आरोपी मुलाचे नाव आहे तर शहनाज मुजावर असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. सादिकने आपल्या आईच्या पोटावर, छातीवर आणि पाठीवर चाकूने वार केले. या घटनेत शहनाज मुजावर या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

मोबाईलवर पत्नीशी बोलताना आई मध्येच बोलल्याने केली हत्या

आरोपी शहनाज मुजावर याचे त्याचे कुटुंबीयांशी वाद होते. त्याच्या बहिणीशी देखील वाद झाले होते. या वादातून सादीक विरोधात कोल्हापूर पोलिस ठाण्यात आईने आई बहिणीने तक्रार देखील दिली होती. दरम्यान, सादीक ह्याची पत्नी माहेरी गेली होती. सादीक हा त्याच्या पत्नीसोबत फोनवार बोलत होता. यावेळी त्याची आई त्याच्याशी मध्येच बोलल्याने सादीकचा राग अनावर झाला. यावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला. माझ्या पत्नीशी मी बोलत असताना तू मघ्येच का बोलली?असे म्हणत त्याने रंगाच्या भरात आईवर चाकूने वार केले. सादिकने ईच्या छातीवर, पोटावर आणि पाठीवर चाकूने वार केले. हे वार वर्मी बसल्याने आईचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी केली अटक

या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर एक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. सादिक मुजावर विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. फक्त आई मध्ये बोललल्याने हत्या झाली की इतर काही कारणामुळे हत्या झाली? याचा तपास पोलीस करत आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या