मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amol mitkari vs Mahesh shinde: खोके आणि ओक्केवरून थेट धक्के-बुक्के… विधानभवनाच्या आवारात मोठा राडा

Amol mitkari vs Mahesh shinde: खोके आणि ओक्केवरून थेट धक्के-बुक्के… विधानभवनाच्या आवारात मोठा राडा

Aug 24, 2022, 05:42 PM IST

    • amol mitkari vs mahesh shinde at Vidhan Bhavan: विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज सत्ताधारी व विरोधकांच्या काही आमदारांमध्ये जोरदार राडा झाला.
Vidhan Bhavan Scuffle

amol mitkari vs mahesh shinde at Vidhan Bhavan: विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज सत्ताधारी व विरोधकांच्या काही आमदारांमध्ये जोरदार राडा झाला.

    • amol mitkari vs mahesh shinde at Vidhan Bhavan: विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज सत्ताधारी व विरोधकांच्या काही आमदारांमध्ये जोरदार राडा झाला.

Clash outside maharashtra Vidhan Sabha: राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी आज सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. खोके आणि ओक्केवरून दोन्ही बाजूचे दोन आमदार हमरीतुमरीवर आले आणि प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत पोहोचले. काही आमदारांनी हस्तक्षेप केल्यामुळं पुढील अनर्थ टळला.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Porsche Accident : पोर्शे कार अपघातातील मृत जोडप्यावर अंत्यसंस्कार, तरुणाच्या भावाचे पोलिसांवर गंभीर आरोप

Pune car accident : पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासन हलले! 'त्या' दोन पब्सना टाळे ठोकण्याचे आदेश

Pune Car Accident : पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना पुणे पोलिस आयुक्तांचे खुले चॅलेंज! म्हणाले….

Latur News : कौटुंबिक कलहातून १४ वर्षांच्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल! क्लासच्या चवथ्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन

शिवसेनेतील बंडाळी, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटानं भाजपसोबत राज्यात मिळून स्थापन केलेलं सरकार, दरम्यान झालेले आरोप-प्रत्यारोप या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नव्या सरकारचं पहिलं अधिवेशन सुरू आहे. पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर जमून शिंदे गटाच्या आमदारांना व भाजपला लक्ष्य करायला सुरुवात केली होती. शिंदे गटाचे आमदार भाजपकडून ५० कोटी रुपये घेऊन शिवसेनेतून फुटल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. त्याच आशयाच्या घोषणा विरोधक पहिल्या दिवसापासून देत आहेत. पन्नास खोके, एकदम ओके… खाऊन ५० खोके, माजलेत बोके… गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुवाहाटी… अशा घोषणांमध्ये रोजच्या रोज नवनव्या घोषणांची भर पडत आहे. त्यामुळं खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील अस्वस्थ झाले होते. सभागृहात त्यांनी याबाबत नाराजीही व्यक्त केली होती. मात्र, विरोधक थांबायला तयार नव्हते.

आज शिंदे गटाच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं करत महाविकास आघाडीला लक्ष्य केले. लवासाचे खोके, बारामती ओके… वाझेचे खोके, मातोश्री ओके… अशा घोषणा शिंदे गटाच्या आमदारांनी दिल्या. घोषणा सुरू असतानाच विरोधी पक्षाचे आमदार तिथं आले. तसा शिंदे गटाच्या आमदारांचा आवाज वाढत गेला. विरोधकांनीही त्यांना उत्तर दिले. त्यामुळं गोंधळ निर्माण झाला. त्याचवेळी शिंदे गटाचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी आमनेसामने आले. त्यामुळं तणाव निर्माण झाला. दोन्ही आमदारांमध्ये हातवारे आणि बाचाबाची सुरू झाली. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच रोहित पवार यांच्यासह अन्य काही आमदारांनी मध्यस्थी केली. त्यामुळं अनर्थ टळला. या प्रकारावरून आता सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मिटकरी यांनी या प्रकाराची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं केली आहे. तर, विरोधकांप्रमाणे आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, असं शिंदे गटाच्या आमदारांनी म्हटलं आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या