मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar : विधानसभेत पुण्यातले 'दादा' विरुद्ध 'दादा'; जमत नसेल तर मंत्रीपद सोडा...

Ajit Pawar : विधानसभेत पुण्यातले 'दादा' विरुद्ध 'दादा'; जमत नसेल तर मंत्रीपद सोडा...

Mar 15, 2023, 01:54 PM IST

    • Ajit Pawar on Chandrakant Patil : विधानसभेच्या कामकाजात लक्षवेधी मांडत असतांना संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित नसल्याने विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सर्वांना धारेवर धरले. त्यात पुण्यात त्यांचे विरोधक समजले जाणारे संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील देखील अजित पवार यांच्या तावडीतून सुटले नाही. भर सभागृहात पवार यांनी चंद्रकात पाटील यांची चांगलीच कानउघाडणी केली.
Ajit Pawar on Chandrakant Patil

Ajit Pawar on Chandrakant Patil : विधानसभेच्या कामकाजात लक्षवेधी मांडत असतांना संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित नसल्याने विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सर्वांना धारेवर धरले. त्यात पुण्यात त्यांचे विरोधक समजले जाणारे संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील देखील अजित पवार यांच्या तावडीतून सुटले नाही. भर सभागृहात पवार यांनी चंद्रकात पाटील यांची चांगलीच कानउघाडणी केली.

    • Ajit Pawar on Chandrakant Patil : विधानसभेच्या कामकाजात लक्षवेधी मांडत असतांना संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित नसल्याने विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सर्वांना धारेवर धरले. त्यात पुण्यात त्यांचे विरोधक समजले जाणारे संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील देखील अजित पवार यांच्या तावडीतून सुटले नाही. भर सभागृहात पवार यांनी चंद्रकात पाटील यांची चांगलीच कानउघाडणी केली.

मुंबई : विधान सभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा आठवड्याचे कामकाज सध्या सुरू आहे. काल तब्बल ८ लक्षवेधी असतांना संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने कामकाज थांबवावे लागले. यावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी संताप व्यक्त करत सभागृहात सत्ताधाऱ्यांची चांगलीच कानउघाडनी केली. यात संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील ही देखील अजित पवारांच्या तावडीतून सुटले नाही. चंद्रकांत पाटील हे देखील सभागृहात उपस्थित नसल्याने त्यांनी थेट जमत नसेल तर मंत्री पद सोडा म्हणत पाटील यांच्यावर टीका केली.

ट्रेंडिंग न्यूज

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली संभाजीराजेंची माफी; म्हणाले “आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."

Mumbai Local : मुंबईच्या लोकलमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार; नशेखोर तरुणांकडून प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

अर्थसंकल्पीय अधिवेशनात सकाळच्या सत्रात मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने अनेक लक्षवेधी पुढे ढकलण्याची वेळ आल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. यावेळी सभागृहात अजित दादा यांनी चंद्रकात दादा यांच्या सभागृहातील उपस्थितीतवरून चांगलेच फैलावर घेतले. चंद्रकांत पाटील यांना लक्ष करत अजित पवार म्हणाले, तुम्ही मंत्रिपदासाठी पुढे पुढे करता. आम्हाला मंत्री करा, यासाठी मागे लागता. परंतु, मंत्री झाल्यावर सभागृहाची परंपरा पाळत नाही. तुम्हाला नेमून दिलेलं वैधानिक काम करत नाही. अध्यक्षसाहेब हे अत्यंत गलिच्छपणाचे कामकाज चालले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना रात्री दोन-अडीचपर्यंत जागून काम करायची सवय आहे. पण चंद्रकांत पाटील तर रात्री दोन-अडीचपर्यंत जागत नाहीत. त्यांनी तरी सकाळी लवकर उठून सभागृहात आले पाहिजे होते. संबंधित ज्याची लक्षवेधी आहे त्यांनी आले पाहिजे.

पवार म्हणाले, अध्यक्ष महोदय आम्ही तुमच्याशी संपर्क साधत असतो. तुम्ही आमच्याशी संपर्क साधत असतात. आम्ही प्रतिसाद देत असतो. जर तुम्ही जबाबदारी घेता तर ती देखील तुम्ही पूर्ण करणे अपेक्षित आहे. मागे जे जे संसदीय कामकाज मंत्री झाले आहे, त्यांनी जबाबदारी घेतली आहे. आज मंत्रिमंडळात केवळ मंगल प्रभात लोढा यांची लक्षवेधी झाली. यांना काही जनाची नाही तर मनाची वाटत नाही का ? ज्यांची लक्षवेधी होती त्या मंत्र्यांनीही सभागृहात उपस्थित राहिले पाहिजे होते. अनेकदा संसदीय कामकाज मंत्री सभागृहात नसतात. देवेंद्रजी आम्ही तुमच्याकडे सिनिअर म्हणून बघतो. तुम्ही उच्चविद्याविभुषित आहात, पण तुमचंही लक्ष नाही. तुम्ही तुमच्या मंत्र्यांना सांगा, असे अजित पवार यांनी म्हटले. आठ लक्षवेधी असतांना सात लक्षवेधी मंत्री सभागृहात नसल्याने पुढे ढकलण्याची नामुष्की ओढावली आहे. अधिवेशनाचा एक एक दिवस कमी होतोय, असेही अजित पवार यांनी म्हटले.

सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी विधीमंडळ सभागृह व्यवस्थित चालण्यासाठी विरोधी पक्ष सर्वतोपरी सहकार्य करत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सभागृहाची प्रथा, परंपंरा मोडण्याचे काम सत्ताधाऱ्यांच्याकडून होत आहे. सदस्य विविध आयुधांचा वापर करुन सभागृहात प्रश्न मांडत असतात, मात्र त्याला उत्तर देण्यासाठी मंत्री सभागृहात उपस्थित राहतच नाहीत. हे वारंवार घडत आहे. त्यामुळे लक्षवेधी सूचना वारंवार पुढे ढकल्याची नामुष्की सभागृहावर येत आहे. हे सभागृह योग्य प्रकारे चालविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते संसदीय कार्यमंत्री स्वत: अनेकवेळा सभागृहात अनुपस्थित असतात, सभागृहाचे कामकाज करण्यासाठी समन्वय साधण्यात ते कमी पडत आहेत, अशी टीकाही अजित पवार यांनी केली.