Kolhapur : सासरचा छळ असह्य! दीड वर्षांच्या चिमुकलीसह रंकाळा तलावात उडी मारून विवाहितेने संपवले जीवन
Kolhapur Crime : सासरच्या मंडळीकडून रोज होणारा त्रास असह्य झाल्याने एका विवाहितेने आपल्या दीड वर्षांच्या चिमुकलीसह रंकाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली.
पुणे : कोल्हापूर येथे एका विवाहितीने सासरच्या जाच्याला कंटाळून आपल्या दीड वर्षांच्या मुलीसह रंकाळा तलावात उडी मारून आत्महत्या केली. विवाहितेने आपल्या मुलीसह जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पती आणि सासू विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली.
ट्रेंडिंग न्यूज
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुकसार अनिस निशाणदार (वय २६) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे तर उमर अनिस निशाणदार (वय दीड, दोघेही मूळ रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले, सध्या रा. रंकाळा टॉवर परिसर, कोल्हापूर) अशी तिच्या मुलीचे नाव आहे या प्रकरणी पती अनिस निशाणदार आणि सासू सायराबानू अन्वर निशाणदार यांचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री साडेआठच्या सुमारास अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी दोघांचे मृतदेह तलावातून बाहेर काढले. दरम्यान, विवाहितेच्या माहेरच्यांनी जो पर्यन्त पती आणि सासुवर कारवाई होत नाही तो पर्यन्त मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका घेतली. यामुळे तानावाचे वातावरण तयार झाले होते. पोलिसांनी समजून सांगितल्यावर त्यांनी माघार घेतली.
फुलेवाडीमधील रुकसारचा अनिस निशाणदारशी विवाह झाला. सुरवातीला त्यांचा संसार व्यवस्थित चालला. मात्र, नोकरी गेल्यावर अनिस हा रुकसार हिच्याशी रोज भांडत होता. दारू पिऊन तिला तो मारहाण करायचा. दोन दिवसंपूर्वी त्यांच्यात जोरदार भांडण झाले होते. त्यानंतर पती अनिस घरातून निघून गेला.
रुकसार ही तिच्या मुलीसह माहेरी फुलेवाडीत आईकडे आली. ती संध्याकाळी पुन्हा परत गेली. सोमवारी दुपारपासून तिचा मोबाइल लागत नसल्याने माहेरच्या नातेवाईकांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तिच्या चपला रंकाळ्यावरील महादेव मंदिराजवळ आढळल्या. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध घेतल्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास रंकाळ्यात आधी मुलीचा आणि नंतर रुकसारचा मृतदेह हाती लागला.
विभाग