मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Adani Electricity : मुंबईकरांना अदानी पॉवरचा झटका; १ मे पासून वीजबिल वाढणार, जाणून घ्या प्रति युनिट दर

Adani Electricity : मुंबईकरांना अदानी पॉवरचा झटका; १ मे पासून वीजबिल वाढणार, जाणून घ्या प्रति युनिट दर

Apr 24, 2024, 08:41 PM IST

  • Adani Pawer Mumbai : मुंबईतील वीज ग्राहकांना मोठी भूर्दंड सहन करावा लागणार असून पुढच्या महिन्यापासून अदानी कंपनीच्या वीज बिलात वाढ होणार आहे.

मुंबईकरांना अदानी पॉवरचा झटका

Adani Pawer Mumbai : मुंबईतील वीज ग्राहकांना मोठी भूर्दंड सहन करावा लागणार असून पुढच्या महिन्यापासून अदानी कंपनीच्या वीज बिलात वाढ होणार आहे.

  • Adani Pawer Mumbai : मुंबईतील वीज ग्राहकांना मोठी भूर्दंड सहन करावा लागणार असून पुढच्या महिन्यापासून अदानी कंपनीच्या वीज बिलात वाढ होणार आहे.

Electricity Price Increase: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी असून १ मे पासून मुंबईतील वीज महागणार आहे. जर तुम्ही अदानी इलेक्ट्रिसिटी (Adani Power ) चे ग्राहक असाल तर तुम्हा खिशाला कात्री लागणार आहे. पुढच्या महिन्यापासून तुमचे वीज बिल वाढणार आहे. याचा झटका अदानी इलेक्ट्रिसिटीच्या जवळपास ३० लाख ग्राहकांना बसणार आहे. फ्यूल सरचार्जच्या (इंधन अधिभार) किंमतीत वाढ झाल्याने वीज दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

Pune Crime : बायको नांदायला येत नसल्याने तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांची उडाली तारांबळ

Sambhajinagar Cylinder blast : संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट; दोघांचा मृत्यू तर ८ जण होरपळले

महाराष्ट्र वीज नियामक आयोग (Maharashtra Electricity Regulatory Commission - MERC) ने अदानी कंपनीला वीज बिलांच्या माध्यमातून फ्यूल सरचार्ज वसुली करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे इलेक्ट्रिसिटी दर महागणार आहे. फ्यूल एडजस्टमेंट फीस (FAC) च्या वसुलीसाठी अदानी पॉवरच्या वीज बिलांमध्ये मे ते ऑगस्ट महिन्यापर्यंत ही वाढ सुरू राहणार आहे. यासाठी एमईआरसीकडून मंजुरी मिळाली आहे.

ग्राहकांना भरावा लागणार FAC -

फ्यूल सरचार्जमध्ये ७० पैसे ते १ रुपये ७० पैशांपर्यंत प्रति यूनिट वाढ करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनाच्या किमतीत वेळोवेळी बदल होत असतो. याचा परिणाम फ्यूल एडजस्टमेंट शुल्कावर पडतो. या फ्यूल एडजस्टमेंट फीस ची किंमत ग्राहकांना भरावी लागते. 

का वसूल केला जातो हा चार्ज?

सोमवारी आयोगाना या प्रस्तावाला मंजुरी दिली व नवे दर लागू करण्याचे निर्देश दिले. वाढीव दराने वीज बिले ग्राहकांकडून मे २०२४ ते ऑगस्ट २०२४ पर्यंत फ्यूल सरचार्जच्या रुपात भरून घेतली जातील. कमर्शियल, इंडस्ट्रियल आणि घरगुती वीर वापरकर्त्या ग्राहकांवरत्यांच्या वापरानुसार फ्यूल सरचार्ज लावला जाईल. फ्यूल एडजस्टमेंट फीसच्या रुपात ग्राहकांकडून जवळपास ३१८ कोटी रुपये वसुली केले जातील.

मे महिन्यापासून विजेचे नवे दर - 

  • ० ते १०० युनिटपर्यंत - ७० पैसे प्रति युनिट 
  • १०१ ते ३०० युनिटपर्यंत - १.१० पैसे प्रति युनिट 
  • ३०१ ते ५०० युनिटपर्यंत - १.५० पैसे प्रति युनिट 
  • ५०० यूनिट हून अधिक - १.७० पैसे प्रति युनिट 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा