मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sambhajinagar Cylinder blast : संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट; दोघांचा मृत्यू तर ८ जण होरपळले

Sambhajinagar Cylinder blast : संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट; दोघांचा मृत्यू तर ८ जण होरपळले

May 04, 2024, 10:26 AM IST

  • Gas Cylinder Blast : संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात शुक्रवारी रात्री घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन २ जणांचा मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले.

संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट; दोघांचा मृत्यू तर ८ जण होरपळले

Gas Cylinder Blast : संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात शुक्रवारी रात्री घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन २ जणांचा मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले.

  • Gas Cylinder Blast : संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात शुक्रवारी रात्री घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन २ जणांचा मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले.

Gas Cylinder Blast in Sambhajingar : छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. येथील किरपुडा भागात एका घरात स्वयंपाक करत असतांना घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला तर ८ जण भाजल्याने जखमी झाले आहेत. दरम्यान, घराशेजारी असणाऱ्या विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने या आग आणखीनच भडकली. दरम्यान, हा स्फोट नेमका कसा झाला याची माहिती मिळू शकली नाही. पोलिस यांचा तपास करत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Dry days List: मुंबईत 'या' महिन्यात कोणकोणत्या दिवशी मिळणार नाही दारू, किती दिवस दुकान बंद?

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी राहणार बंद

Fact Check: लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे आणि शिंदे गट भाजपमध्ये विलिन होणार? सत्य काय? वाचा!

Navi Mumbai: नववीत शाळा सोडली, युट्यूबवर पाहून नोटा छापायचं शिकला, 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात!

Nijjar Murder Case : कॅनडा पोलिसांची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येतील तिघा संशयितांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत सदफचा या लहानमुलाचा मृत्यू झाला. तर घरातील रिझवान खान सत्तार खान (४०), रिहान चांद शेख (१७), अदिल खान इरफान खान (१०), फैजान रिझवान पठाण (१३), दिशान रिझवान खान (९) हे होरपळले असून त्यांच्यावर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Maharashtra Weather update: राज्यात सूर्य आग ओकणार! मुंबई, ठाणे, सोलापूर येथे उष्णतेची लाट येणार! विदर्भात पावसाचा अलर्ट

मिळालेल्या माहितीनुसार किराडपुऱ्यातील रोशन मस्जिदजवळील गल्ली क्र. १५ मध्ये एका दोन खोल्यांच्या घरात इरफान पठाण हे दोन भावांसह राहतात. शुक्रवारी रात्री ते कामावरून घरी आले होते, यावेळी त्यांची पत्नी व इतर कुटुंबातील महिला या स्वयंपाकाची तयारी करत होत्या. मात्र, रात्री ८:३० वाजेच्या सुमारास अचानक घरात आग लागली. पाहता पाहता आगीने संपूर्ण खोलीला विळखा घातला. यात काही कुटुंबीय हे अडकले. तर काही जण बाहेर पडले. ४ वर्षांची सदफ देखील आत अडकून पडला, त्याला वाचवण्यासाठी कुटुंबातील काहींनी आत धाव घेतली. मात्र, याच वेळी घरातील सिलिंडरचा स्फोट झाला. तर घरच्या वरील विजेच्या तारा लोंबकळत होत्या. यात वीज प्रवाह सुरू असलूयाने आणखी ठिणग्या उडून काही स्फोट झाले. या घटनेमुळे परिसरात मोठी धावपळ उडाली. स्थानिक नागरिकांनी धाव घेत पाणी व वाळू टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला.

अरुंद रस्त्यामुळे बचाव कार्यात अडथळे

किराडपुऱ्यातील रास्ते हे अरुंद आहेत. येथे गल्लीबोळ असल्याने अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना घरा पर्यंत जाण्यास अडचणी येत होत्या. जवानांनी आग विझवण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच घर आगीत भस्मसात झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिस देखील फॉरेन्सिक पथक, श्वान पथकासह घटनास्थळी पोहचले. कशी बक्षी अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या