मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather update: राज्यात सूर्य आग ओकणार! मुंबई, ठाणे, सोलापूर येथे उष्णतेची लाट येणार! विदर्भात पावसाचा अलर्ट

Maharashtra Weather update: राज्यात सूर्य आग ओकणार! मुंबई, ठाणे, सोलापूर येथे उष्णतेची लाट येणार! विदर्भात पावसाचा अलर्ट

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 04, 2024 06:35 AM IST

Maharashtra Weather update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. तापमानात मोठी वाढ होत आहे. पुढील काही दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात उष्णतेची लाट तर विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात सूर्य आग ओकणार! मुंबई, ठाणे, सोलापूर येथे उष्णतेची लाट येणार! विदर्भात पावसाचा अलर्ट
राज्यात सूर्य आग ओकणार! मुंबई, ठाणे, सोलापूर येथे उष्णतेची लाट येणार! विदर्भात पावसाचा अलर्ट

Maharashtra Weather update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. तापमानात मोठी वाढ होत आहे. पुढील काही दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात उष्णतेची लाट तर विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणात, मुंबई, ठाणे, रायगड तर मध्य महाराष्ट्रात सोलापूर आणि मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद, बीड येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भात काही जिल्ह्यात वादळी वारे आणि पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवारी राज्यात मालेगाव सर्वाधित उष्ण ठरले. येथे सर्वाधिक ४३.८ तर अकोला येथे ४३. ३ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रेंडिंग न्यूज

Gadchiroli: गडचिरोलीतील धक्कादायक घटना, काळ्या जादूच्या संशयातून २ जणांना जिवंत जाळले; १५ जणांना अटक

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यावर कुठलीही वेदर सिस्टीम कार्यान्वित नाही. महाराष्ट्र राज्यात पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. कोकणात बहुतांश जिल्ह्यात पुढील ३ दिवस हवामान दमट उष्ण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात सोलापूर येथे ४ व ५ तारखेला, मराठवाड्यात बीड येथे ५ तारखेला लातूर व उस्मानाबाद येथे ४ व ५ तारखेला उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. विदर्भात ७ तारखेला काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघ गर्जना वीजांचा कडकडाट व वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा ताशी वेग ४० ते ५० किलोमीटर असणण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे विदर्भात ६ व ७ तारखेला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

Mumbai Fire: मुंबईच्या अंधेरीत गॅस पाइपलाइन लिकेज झाल्याने आग, ४ जण होरपळले; रुग्णालयात उपचार सुरू

पुण्यात असे असेल हवामान

पुणे व परिसरात तीन दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील चार दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुण्यात शुक्रवारी तापमान ४०.१ डिग्री सेल्सिअस एवढे होते. पुण्यात काही दिवस तापमानात चढ उतार होणार असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

मुंबईत तापमानातील वाढ कायम

मुंबईत तापमानातील वाढ कायम आहे. उष्णता आणि दमट वातावरनामुळे नागरिक हैराण झाले आहे. मुंबईत शुक्रवारी ३३.२, सांताक्रुज येथे ३३, अलिबाग येथे ३२ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

IPL_Entry_Point