मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

May 04, 2024, 09:55 AM IST

    • Mumbai Police constable Vishal Pawar death Case : फटका गँगच्या विषारी इंजेक्शनमुळे मुंबई पोलीस दलातील हवालदाराचा बुधवारी (१ मे) रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. विषारी इंजेक्शनमुळे मृत्यूचा बनाव रचला गेल्या असल्याचा पोलीसांना संशय आहे.
कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

Mumbai Police constable Vishal Pawar death Case : फटका गँगच्या विषारी इंजेक्शनमुळे मुंबई पोलीस दलातील हवालदाराचा बुधवारी (१ मे) रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. विषारी इंजेक्शनमुळे मृत्यूचा बनाव रचला गेल्या असल्याचा पोलीसांना संशय आहे.

    • Mumbai Police constable Vishal Pawar death Case : फटका गँगच्या विषारी इंजेक्शनमुळे मुंबई पोलीस दलातील हवालदाराचा बुधवारी (१ मे) रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. विषारी इंजेक्शनमुळे मृत्यूचा बनाव रचला गेल्या असल्याचा पोलीसांना संशय आहे.

Mumbai Police constable death Case : फटका गँगच्या विषारी इंजेक्शनमुळे मुंबई पोलीस दलातील विशाल पवार या हवालदाराचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या पोलिस हवालदारावर तीन दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. लोकलच्या दारात उभे असताना फटका गँगच्या चोरट्यांनी त्यांचा मोबाइल चोरला. तसेच त्यांचा पाठलाग करतांना विषारी इंजेक्शनच्या प्रयोगामुळे पवार यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, रेल्वे पोलिसांच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज पुढे आले आहे. तसेच पवार यांच्या मोबाईल कॉलच्या तपासणीवरून मृत पोलिसाने सांगितलेला घटनाक्रम जुळत नअसल्याने मृत पवार यांनी विषारी इंजेक्शनचा बनाव रचल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Man Locked Wifes Private Parts : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

Mumbai: मुंबईतील करी रोड, माटुंगा, महालक्ष्मी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार, जाणून घ्या कारण

Mumbai Dry days List: मुंबईत 'या' महिन्यात कोणकोणत्या दिवशी मिळणार नाही दारू, किती दिवस दुकान बंद?

mumbai water cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी बंद

Raj Thackeray: 'सत्तेसाठी स्वाभिमान गहाण टाकणे शक्य नाही'; 'त्या' ऑफरवर राज ठाकरे यांचे सणसणीत उत्तर

विशाल पवार (वय, २०) असे मृत्यू झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. पवार हे मुंबई पोलिसांच्या वरळी लोकल आर्म्स डिव्हिजन-३ मध्ये कार्यरत होते. दरम्यान, २८ एप्रिल २०२४ रोजी माटुंगाजवळील रेल्वे रुळांवर फटका गँगने मयत पोलीस हवालदाराला विषारी इंजेक्शन टोचल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते.

Gas Cylinder Blast in sambhajinagar : संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट; दोघांचा मृत्यू तर ८ जण होरपळले

१२ तपास पथकांनी घेतला शोध

विशाल पवार यांच्या मृत्यू प्रकरणी दादर लोहमार्ग पोलिसांनी १२ तपास पथके तयार केली. या पथकाने वेगवेगळ्या दिशेने चौकशी सुरू केली. या पथकाने ठाणे ते भायखळा दरम्यानचे सिसिटीव्ही तपासण्यात आले. या फुटेजमध्ये विशाल हे माटुंगा रेल्वेस्थानकात मध्यरात्री ते पहाटेपर्यंत कुठेच आढळले नाहीत. त्याच रात्री विशाल दादर रेल्वेस्थानकाबाहेर कैलास लस्सी दुकानाजवळ सीसी टीव्ही फुटेजमध्ये ते आढळले. तयांनी त्यांनी शेवटचा फोन हा त्यांच्या चुलत भावाला केला होता. यानंतर त्यांचा फोन बंद झाला. दुसऱ्या दिवशी माटुंगा रेल्वेस्थानकावरून ठाण्याची लोकल पकडताना तसेच घरी पोचताना सीसी टीव्ही फुटेजमध्ये दिसले. पवार घरी परतले तेव्हा त्यांच्याजवळ मोबाईल नव्हता. बंद अवस्थेतील या मोबाईलचा शोध पोलिस घेत आहेत. हा सर्व घटनाक्रम बघता विशाल पवार यांनी कोपरी पोलिस ठाण्यात दिलेला जबाब ही रचलेली कथा असावी, असा संशय तपास करणाऱ्या पोलिसांना आहे. पोस्टमार्टेम अहवालानंतर अनेक प्रश्नांचा उलगडा होणार आहे. तपास पथकाच्या या खुल्यासामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

Pune Crime : पत्नी नांदायला येत नसल्याने तरुणाचा भर पोलीस चौकीत आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांची उडाली तारांबळ

काय आहे प्रकरण

विशाल पवार हे मुंबई लोकलने ड्युटीसाठी जात असतांना सायन स्थानकांदरम्यान दरवाज्यात उभे असतांना विशाल हे फोनवर बोलत असताना फटका गँगच्या एका सदस्याने त्यांच्या हातावर फटका मारला व त्यांचा मोबाइल लंपास केला. विशाल यांनी लोकलचा वेग कमी असल्याने चोरट्यांचा गँगचा पाठलाग केला. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर फटका गँगने विशाल यांना घेरले, मारहाण केली आणि त्यांच्या पाठीत विषारी इंजेक्शन टोचले. यामुळे ते बेशुद्ध झाले. दुसऱ्या दिवशी शुद्ध आल्यावर ते घरी गेल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना दवाखान्यात भरती केल्यावर त्यांच्यावर तीन दिवस उपचार केल्यावर त्यांचा मृत्यू झाला होता.

हे प्रश्न अनुत्तरित

लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला तेव्हा विशाल पवार यांनी सांगितलेला घटनाक्रम जुळत नसल्याचे आढळले आहे. ते नेमके कोठे गेले होते. त्यांच्या सोबत नेमके काय झाले? त्यांनी मृत्यू पूर्वी खोटी माहिती का सांगितली? त्यांची प्रकृती ही कशी बिघडली या प्रश्नांची उत्तर पोलिसांना अद्याप मिळालेली नाही. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या