Raj Thackeray news: महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढण्याच्या ऑफरवर उत्तर दिले आहे. राज ठाकरे महायुतीत सहभागी होण्या आधी त्यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली होती. यावेळी अमित शहा यांनी त्यांना भाजपकडून धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढण्याची ऑफर दिली होती. मात्र, ठाकरे यांनी हा प्रस्ताव नाकारला होता. या बाबत बोलतांना राज ठाकरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराने धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढावे, असा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवण्यात आला. मात्र, हा प्रस्ताव मी नाकारला, कारण सत्तेसाठी स्वाभिमान गहाण टाकणं माझ्याने शक्य नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी या बाबत खुलासा केला. राज ठाकरे यांना या मुलाखतीत धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यात यावी याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या वर तयांनी उत्तर दिले. राज ठाकरे म्हणाले, मला धनुष्यबाण चिन्हावर लढण्याची ऑफर मिळाली. मात्र, या ऑफरवर मी हसलो. महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे इंजिन चिन्ह मी कमावले चिन्ह असून मला ते कोर्टाने दिलेले नाही. लोकांनी मतदान केल्यामुळे मला ते मिळाले आहे. त्यामुळे केवळ सत्तेसाठी मी माझ्या पक्षाच्या उमेदवारांना दुसऱ्या चिन्हावर उभे राहण्यास कसे सांगू शकतो? सत्तेसाठी या थराला जाणे शक्य नाही. सत्तेसाठी मी माझा स्वाभिमान गहाण टाकू शकत नसल्याचे देखील राज ठाकरे म्हणाले.
शिवसेना हा बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे. त्या पक्षाचे नेतृत्त्व करायचे, हा विचार माझ्या मनात कधीच आला नाही. या साठी मी कोणत्याही देवाची शपथ घेऊन सांगायला तयार आहे. शिवसेनेचा पक्षप्रमुख व्हावे हे माझ्या कधीही ध्यानी मानी आले नाही. माझी एवढीच मागणी होती की, मला पक्षातील माझी जबाबदारी सांगा.
मला फक्त निवडणुकीपुरते बाहेर काढायचे आणि नंतर काहीही काम न देता बसवून ठेवायचे या गोष्टी मला मान्य नव्हत्या, असे ठाकरे म्हणाले. मी शिवसनेनेत माझ्या काकांना मदत करावी या भावनेने काम केले. मला पदाची लालसा नव्हती. शिवसेनेचे ३२ आमदार आणि ७ खासदार माझ्याकडे होते. जर मला पक्ष फोडायचा असता तर मी केव्हाच तो फोडला असता. मी बाळासाहेब ठाकरे यांना सांगून शिवसेनेतून बाहेर पडलो असून मला दगा फटका करायचा नव्हता असे ठाकरे म्हणाले.
संबंधित बातम्या