Gas Cylinder Blast in Sambhajingar : छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. येथील किरपुडा भागात एका घरात स्वयंपाक करत असतांना घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला तर ८ जण भाजल्याने जखमी झाले आहेत. दरम्यान, घराशेजारी असणाऱ्या विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने या आग आणखीनच भडकली. दरम्यान, हा स्फोट नेमका कसा झाला याची माहिती मिळू शकली नाही. पोलिस यांचा तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत सदफचा या लहानमुलाचा मृत्यू झाला. तर घरातील रिझवान खान सत्तार खान (४०), रिहान चांद शेख (१७), अदिल खान इरफान खान (१०), फैजान रिझवान पठाण (१३), दिशान रिझवान खान (९) हे होरपळले असून त्यांच्यावर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार किराडपुऱ्यातील रोशन मस्जिदजवळील गल्ली क्र. १५ मध्ये एका दोन खोल्यांच्या घरात इरफान पठाण हे दोन भावांसह राहतात. शुक्रवारी रात्री ते कामावरून घरी आले होते, यावेळी त्यांची पत्नी व इतर कुटुंबातील महिला या स्वयंपाकाची तयारी करत होत्या. मात्र, रात्री ८:३० वाजेच्या सुमारास अचानक घरात आग लागली. पाहता पाहता आगीने संपूर्ण खोलीला विळखा घातला. यात काही कुटुंबीय हे अडकले. तर काही जण बाहेर पडले. ४ वर्षांची सदफ देखील आत अडकून पडला, त्याला वाचवण्यासाठी कुटुंबातील काहींनी आत धाव घेतली. मात्र, याच वेळी घरातील सिलिंडरचा स्फोट झाला. तर घरच्या वरील विजेच्या तारा लोंबकळत होत्या. यात वीज प्रवाह सुरू असलूयाने आणखी ठिणग्या उडून काही स्फोट झाले. या घटनेमुळे परिसरात मोठी धावपळ उडाली. स्थानिक नागरिकांनी धाव घेत पाणी व वाळू टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला.
किराडपुऱ्यातील रास्ते हे अरुंद आहेत. येथे गल्लीबोळ असल्याने अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना घरा पर्यंत जाण्यास अडचणी येत होत्या. जवानांनी आग विझवण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच घर आगीत भस्मसात झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिस देखील फॉरेन्सिक पथक, श्वान पथकासह घटनास्थळी पोहचले. कशी बक्षी अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.
संबंधित बातम्या