मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Sleep Divorce म्हणजे काय? नाते वाचवण्यासाठी कपल्स करतायत फॉलो

Sleep Divorce म्हणजे काय? नाते वाचवण्यासाठी कपल्स करतायत फॉलो

May 11, 2023, 10:54 PM IST

    • What is Sleep Divorce: आजकाल स्लीप डिव्होर्स घेण्याचा ट्रेंड खूप वेगाने वाढला आहे. ज्यामध्ये पती-पत्नी एकाच घरात राहत आहेत आणि झोपण्यासाठी वेगवेगळ्या खोल्या वापरत आहेत. काय आहे हे जाणून घ्या.
रिलेशनशिप टिप्स (freepik)

What is Sleep Divorce: आजकाल स्लीप डिव्होर्स घेण्याचा ट्रेंड खूप वेगाने वाढला आहे. ज्यामध्ये पती-पत्नी एकाच घरात राहत आहेत आणि झोपण्यासाठी वेगवेगळ्या खोल्या वापरत आहेत. काय आहे हे जाणून घ्या.

    • What is Sleep Divorce: आजकाल स्लीप डिव्होर्स घेण्याचा ट्रेंड खूप वेगाने वाढला आहे. ज्यामध्ये पती-पत्नी एकाच घरात राहत आहेत आणि झोपण्यासाठी वेगवेगळ्या खोल्या वापरत आहेत. काय आहे हे जाणून घ्या.

Sleep Divorce Affect Couples Intimacy and Relationship: निरोगी राहण्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी किमान ७-८ तासांची झोप आवश्यक आहे. पण जेव्हा कपल्सच्या नात्याचा विचार केला जातो तेव्हा झोपेचा उल्लेख केला जात नाही. एकाच बेडवर एक व्यक्ती झोपली तरी रात्रभर झोप न येण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशा स्थितीत नात्यात भांडणे आणि वाद होणे सामान्य गोष्ट आहे. वाढत्या तणावासोबतच झोपेच्या कमतरतेमुळे नात्यात चिडचिडेपणा निर्माण होतो. अशा परिस्थितीत कपल्स आता स्लीप डिव्होर्सचा ट्रेंड फॉलो करत आहेत. ज्यामध्ये ते वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आरामात झोपतात.

ट्रेंडिंग न्यूज

Mango Storage Tips: पिकलेले आंबे होणार नाही लवकर खराब, फक्त साठवताना लक्षात ठेवा या गोष्टी

Jaljeera Recipe: उन्हाळ्यात शरीराला कूल ठेवेल थंडगार जलजीरा, बनवण्यासाठी नोट करा रेसिपी

Health Care Tips: ही फळे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास आरोग्याला पोहोचते हानी, जाणून घ्या याचे कारण

Raita Recipe: उन्हाळ्यात या ५ गोष्टींपासून बनवा टेस्टी रायता, पाहा जेवणाची चव वाढवणारी रेसिपी

Relationship Mistakes: लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये करत नाही ना या चुका? ठरू शकतात ब्रेकअपचे कारण

स्लीप डिव्होर्स म्हणजे काय

स्लीप डिव्होर्स हा एका करारासारखा आहे ज्यामध्ये पती-पत्नी एकाच घरात राहतात पण रात्री बेड आणि रूम शेअर करत नाहीत. कपल्स अशा प्रकारे स्वतंत्रपणे झोपणे म्हणजे सहसा नाते समाप्तीचे किंवा कटुतेचे प्रतीक मानले जाते. परंतु अनेक जोडप्यांना यामुळे रिलेशनशिप चांगले वाटत आहेत. स्लीप डिव्होर्स पूर्णपणे परस्पर संमतीवर अवलंबून असतो. ज्यामध्ये काही दिवसांनी जुनी दिनचर्या परत केली जाऊ शकते आणि जोडपे एकत्र झोपू लागतात.

Condition For Divorce: वैवाहिक जीवनात येतायत हे ४ अनुभव? घटस्फोट घेणे आहे शहाणपणाचे

का आहे स्लीप डिव्होर्सची गरज 

- कपल्समध्ये कोणा एका जोडीदाराची घोरण्याची सवय दुसऱ्या जोडीदाराला रात्रभर शांत झोपू देत नाही.

- तर लॅपटॉपवरील कामाचे वेळापत्रक आणि काम यामुळे जोडीदाराची रात्रभर झोप उडते.

- काही लोकांना स्लीप एपनियाची समस्या असते, तर काही जोडप्यांना त्यांच्यापैकी एकाने पुन्हा पुन्हा बाथरूममध्ये जाण्याच्या समस्येने त्रास होतो.

- कधी कधी काही लोकांना एकटे झोपायला आवडते. अशा परिस्थितीत स्लीप डिव्होर्स अशा लोकांचे नाते वाचवण्याचे काम करत आहे.

Dear Love Birds, दोघातील या प्रायव्हेट गोष्टी चुकूनही करू नका शेअर

स्लीप डिव्होर्सचे फायदे

झोपेच्या कमतरतेमुळे जोडप्यांमध्ये भांडणे आणि वियोग होऊ लागतात. कामाचा ताण आणि झोपेची कमतरता यामुळे नातेसंबंधांवर परिणाम होत असेल तर वेगळे झोपणे वाईट नाही. मात्र, यामध्ये परस्पर समंजसपणा आवश्यक आहे. जोडप्याने हे समजून घेणे आवश्यक आहे की नात्यात वेगळे झोपल्याने इंटीमेसीवर परिणाम होत नाही. जेव्हा तुम्हाला कोणत्याही डिस्टर्बन्सशिवाय झोपायचे असेल तेव्हा वेगळ्या बेडवर जा आणि शांतपणे झोपा. तरुण पिढीला या ट्रेंडिंग घटस्फोटाचे अनेक फायदे दिसत आहेत आणि त्यांना ते खूप आवडले आहे.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग