मराठी बातम्या  /  Lifestyle  /  Couples Should Never Share These Private Things To Anyone

Dear Love Birds, दोघातील या प्रायव्हेट गोष्टी चुकूनही करू नका शेअर

रिलेशनशिप टिप्स
रिलेशनशिप टिप्स
Hiral Shriram Gawande • HT Marathi
Apr 30, 2023 10:48 PM IST

Relationship Tips: उत्साहात आपली लव्ह लाइफ कुठेपण शेअर करणारे लोक तुम्ही अनेकदा पाहिले असतील. पण हे करणे चुकीचे आहे. कपल्सनी त्यांच्यातील काही सिक्रेट्स हे कधीच कोणासोबत शेअर करू नये. कोणते ते जाणून घ्या.

Private Things in Couple: माणूस कितीपण समजूतदार असला तरी प्रेमात असेल तर कळत-नकळत काहीतरी घोळ घालतोच, असे म्हटले जाते. तुमची छोटीशी चूक तुमच्या नात्यावर परिणाम करू शकते. अनेक वेळा एक्साइट होऊन काही जण त्यांच्या पार्टनरसोबतचं लव्ह लाइफ कोणासोबत पण शेअर करतात. असे केल्याने कधी कधी तुमच्या चांगल्या नात्याला नजर लागू शकते, शिवाय तुमचे वाइट चिंतणारे लोक तुमचे नाते तोडण्यासाठी देखील प्रयत्न करू शकतात. त्यामुळे नाते पुढे नेत असताना बऱ्याच गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. जर तुम्ही देखील रिलेशनशिपमध्ये असाल तर तुम्ही या प्रायव्हेट सिक्रेट कोणासोबत शेअर करू नका. कोणते ते जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

Married Relation: नात्यात दिसत असतील या गोष्टी तर भविष्यात निश्चित आहे घटस्फोट

गिफ्ट डिस्कस करू नका

कधी पण कोणाला हे सांगू नका कि तुमच्या पार्टनरने तुम्हाला काय गिफ्ट दिले आहे किंवा तुम्ही तुमच्या पार्टनरला काय गिफ्ट दिले आहे. ही गोष्ट फक्त तुमच्या दोघांतील आहे. विशेषतः एखाद्या खास प्रसंगी तुम्ही तुमच्या पार्टनरला काय गिफ्ट देणार हे कोणाला सांगू नका.

बेडरुम सिक्रेट्स

कोणी कितीही खास असले तरी चुकूनही किंवा गंमतीतही तुमचे बेडरूम सिक्रेट्स कोणासोबत शेअर करू नका. हल्ली कपल्समध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून तणाव असतो. अशा परिस्थितीत जेव्हा आपण अशा गोष्टी शेअर करतो तेव्हा त्यांच्या मनात त्यांच्या परिस्थितीबद्दल दुःख आणि राग यासारख्या भावना येतात.

Relationship Tips: आता नातं टिकणार नाही असं दिसतंय? तर या ५ मार्गांनी करा गुडबाय

पार्टनरविषयी वाईट बोलणे

कपल्समध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद किंवा भांडण होते हे कॉमन आहे. पण तरीही तुमच्या तुमच्यातील भांडणाबद्दल कोणालाही सांगू नका. विशेषतः पार्टनरवर टीका करू नका. असे केल्याने लोक तुमच्या भांडणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात.

फायनांशियल इश्यु

घरातील बजेटशी संबंधीत समस्या किंवा भविष्यातील इंव्हेस्टमेंट प्लॅन कोणासोबत शेअर करू नका. तुमच्या दोघांतील या गोष्टी बाहेर गेल्याने समस्या निर्माण होऊ शकतात. पैशाशी संबंधित कोणतीही गोष्ट कोणाला सांगू नका.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel