मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Skin Ageing: कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे वयाच्या आधीच तुम्ही म्हातारे दिसू लागता? जाणून घ्या

Skin Ageing: कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे वयाच्या आधीच तुम्ही म्हातारे दिसू लागता? जाणून घ्या

Apr 17, 2024, 04:11 PM IST

    • Vitamin Deficiency: चेहऱ्यावर सुरकुत्या अनेक कारणांमुळे येऊ शकतात. जीवनसत्त्वांची कमतरता हे यापैकी एक कारण आहे. चला जाणून घेऊया कोणत्या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे सुरकुत्या पडतात, वयापेक्षा लवकर तुमची त्वचा म्हातारी दिसू लागते.
vitamin Deficiency can makes you look old before your age (freepik)

Vitamin Deficiency: चेहऱ्यावर सुरकुत्या अनेक कारणांमुळे येऊ शकतात. जीवनसत्त्वांची कमतरता हे यापैकी एक कारण आहे. चला जाणून घेऊया कोणत्या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे सुरकुत्या पडतात, वयापेक्षा लवकर तुमची त्वचा म्हातारी दिसू लागते.

    • Vitamin Deficiency: चेहऱ्यावर सुरकुत्या अनेक कारणांमुळे येऊ शकतात. जीवनसत्त्वांची कमतरता हे यापैकी एक कारण आहे. चला जाणून घेऊया कोणत्या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे सुरकुत्या पडतात, वयापेक्षा लवकर तुमची त्वचा म्हातारी दिसू लागते.

Vitamin B-12 Deficiency causes Skin Ageing: त्वचेवरील सुरकुत्या चेहऱ्याच्या सौंदर्यावर नकारात्मक परिणाम करतात. यामुळे तुम्ही वयाच्या आधीच म्हातारे दिसू लागता. अशावेळी आपण विविध घरगुती उपाय आणि बाह्य उत्पादनांचा वापर करू लागतो. या उत्पादनांचा वापर करून त्वचेवर फारसा फरक दिसत नाही. अशा परिस्थितीत बरेच लोक अधिक चिंतित होतात. चेहऱ्यावर सुरकुत्या नको असतील तर त्वचेच्या काळजीसोबतच आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. शरीरात काही जीवनसत्त्वे असतात, ज्याच्या कमतरतेमुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. या जीवनसत्त्वांच्या कमतरतेची वेळीच दखल घेतली नाही, तर तुम्हाला इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची चिन्हे त्वचेवर दिसतात आणि याचमुळे तुम्ही वयाच्या आधी म्हातारे दिसू लागता.

ट्रेंडिंग न्यूज

Carrer Tips: एमबीए आणि पीजीडीएम लँडस्‍केपमधून नेव्हिगेट करताना कोणता मार्ग आहे सर्वोत्तम? जाणून घ्या

Melon Cooler: उन्हाळ्यात थंड ठेवेल मेलन कूलर, नोट करा शेफ रणवीरची ही टेस्टी रेसिपी

Cancer Risk: डोकं आणि मानेच्या कर्करोगाचे वाढत आहे प्रमाण, जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

Weight Loss Mistakes: रोजच्या या चुकांमुळे वाढू लागतं वजन, तुम्हीही करता का ही चूक?

या गोष्टी लक्षात घ्या

> जेव्हा शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असते तेव्हा हायपरपिग्मेंटेशनची समस्या उद्भवू शकते. यामध्ये त्वचेवर डाग पडणे, त्वचा काळवंडणे अशा गोष्टी होतात. लक्षात घ्या जेव्हा शरीराच्या कोणत्याही भागाची त्वचा काळी पडते तेव्हा ती हायपरपिग्मेंटेशनची समस्या असू शकते. त्वचेला रंग देणाऱ्या मेलेनिन रंगद्रव्याचे उत्पादन वाढते तेव्हा ही स्थिती उद्भवते. जास्त वेळ उन्हात राहिल्यास हायपरपिग्मेंटेशनमुळे होणारे डाग गडद होतात.

Tips for success: महिलांनो काम आणि कौटुंबिक जीवनातील निरोगी संतुलन राखण्यासाठी फॉलो करा या टिप्स!

> या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे त्वचा पिवळी पडू शकते. त्वचेमध्ये मुंग्या येणे आणि जळजळ जाणवू शकते. जिभेच्या रंगात बदल देखील दिसू शकतो. तसेच, तोंडात अल्सर, अंधुक दृष्टी, नैराश्य, चिडचिड वाटणे, वागण्यात बदल, काहीही समजण्यात आणि निर्णय घेण्यात समस्या असू शकते.

Health Care: सर्वेक्षणानुसार ३ पैकी २ लोकांना रोगप्रतिकारशक्ती वाढवण्‍यासाठी असते या व्हिटॅमिन सप्‍लीमेंट्सची आवश्यकता!

> जर तुमचे केस जास्त गळत असतील तर ते व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेचे लक्षण असू शकते. केसांची योग्य वाढ होण्यासाठी हे जीवनसत्व आवश्यक असते. त्यामुळे तुमच्या आहारात व्हिटॅमिन बी१२ समृद्ध असलेल्या गोष्टींचा समावेश करणे चांगले.

Tanning remedies: घरात ठेवलेल्या या गोष्टी उन्हाळ्यातील टॅनिंग करतात दूर, जाणून घ्या उपाय!

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)

विभाग