How To Remove Tanning: उन्हाळा आला की त्वचेवर टॅनिंगची समस्या वाढते. कडक सूर्यप्रकाशामुळे चेहऱ्याचा रंग डार्क होऊ लागतो. शरीराचा कोणताही भाग सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतो तेव्हा तिथली त्वचा टॅन होतो. काही वेळा हात आणि पायांवरही खुणा दिसतात. टॅनिंगमुळे त्वचेवर गडद छटाही दिसू लागतात. अँटी टॅनिंग क्रीम, लोशन आणि अनेक प्रकारचे चेहऱ्यावरील उपचार देखील बाजारात उपलब्ध आहेत. पण, आपण काही घरगुती उपाय वापरून टॅन त्वचा बरे करू शकता. यासाठी तुम्हाला बाजारातून काहीही खरेदी करण्याची गरज नाही. जाणून घ्या टॅनिंग दूर करण्यासाठी कोणते प्रभावी घरगुती उपाय आहेत.
हा एक रामबाण उपाय आहे. उन्हामुळे त्वचाकाळी झाली असेल तर तुम्ही बेसन आणि दही वापरू शकता. यामुळे त्वचा थंड होते आणि टॅनिंग कमी होते. बेसनाच्या पिठात १-२ चमचे दही मिसळून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर आणि मानेला लावा. यामुळे टॅनिंग कमी होण्यास मदत होते आणि डेड स्किनही निघून जाते. दही आणि बेसन देखील पिगमेंटेशन आणि डाग कमी करते.
बटाट्याचा रस , होय तुम्ही नीट वाचले. बटाट्याचा रस त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतो. विशेषतः जेव्हा सूर्यप्रकाशामुळे त्वचा जळते तेव्हा त्या त्वचेवर कच्च्या बटाट्याचा रस त्वचेला बरा करण्याचे काम करतो. कच्च्या बटाट्याचा रस लावल्याने त्वचेचा काळा रंग निघून जातो. टॅनिंगची समस्या दूर होते आणि काळे डाग कमी होतात. बटाट्याचा रस त्वचेवर नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करतो. यासाठी कच्च्या बटाट्याचा रस कापसाच्या साहाय्याने त्वचेवर लावा आणि काही वेळाने चेहरा पाण्याने धुवा.
कच्चे दूध आणि तांदळाचे पीठ हे मिश्रण तर फारच प्रभावी उपाय आहे. तांदळाच्या पिठात कच्चे दूध मिसळले की त्याचे फायदे दुप्पट होतात. यामुळे टॅनिंग, काळेपणा आणि डाग दूर होतात. तांदूळ आणि दूध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने रंग निखळतो आणि चेहऱ्यावर चमक येते. चेहरा आणि मान दोन्हीवर लावा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)