मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Skin Sun Burn: उन्हात बाहेर गेल्यावर तुमचा चेहरा लाल होतोय, या २ गोष्टी लावा!

Skin Sun Burn: उन्हात बाहेर गेल्यावर तुमचा चेहरा लाल होतोय, या २ गोष्टी लावा!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Apr 03, 2024 01:18 PM IST

Skin Care Tips: सूर्यप्रकाशामुळे चेहरा लाल होतो आणि त्वचा जळण्याची समस्या सुरू होते. अशावेळी घरी आल्यानंतर त्वचा कशी थंड करावी हे जाणून घ्या.

Sunburn Home Remedies
Sunburn Home Remedies (freepik)

Skin burn due to hot weather: कडक उन्हाळा सुरु झाला आहे. उष्णतेचा पारा वाढला आहे. उन्हाळ्याचे आगमन होताच शाररिक रित्या फार थकायला होता. उन्हाळ्यात त्वचा झपाट्याने खराब होऊ लागते. अनेक कारणांनी त्वचा आतून खराब होऊ लागते, पेशी खराब होतात.अनेकांच्या चेहऱ्यावर लालसरपणा आणि सूज येण्याची समस्या सुरू होते. वास्तविक, याला सनबर्न असेल म्हणतात. ज्यामध्ये त्वचेवर तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचा आतून खराब होऊ लागते आणि त्वचा पिगमेंटेशन होते. याशिवाय चेहऱ्यावर सूर्यप्रकाशामुळे अनेक समस्या निर्माण होतात ज्यांचे परिणाम दीर्घकाळ दिसून येतात. अशा परिस्थितीत तुम्ही या दोन गोष्टी त्वचेवर वापरू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

चेहऱ्यावर दही लावा

चेहऱ्यावर दही लावा. दही लावल्याने त्वचा आतून शांत होण्यास मदत होते. तुम्ही उन्हातून घरी परतल्यावर तुमचा चेहरा लाल आणि गरम असेल, तेव्हा फ्रिजमधून थोडं थंड दही काढून चेहऱ्यावर लावा आणि काही वेळ तसंच राहू द्या. हलक्या हातांनी चेहरा स्क्रब करा आणि काही वेळ तसाच राहू द्या. अशा प्रकारे ते त्वचेला थंड करते.

Summer Care: हे सुपरफूड्स उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यास करतील मदत! आहारात करा समावेश

बर्फ लावा

त्वचा जळू नये म्हणून तुम्ही तुमच्या त्वचेवर बर्फ लावावा. फक्त हा बर्फ थेट त्वचेवर लावू नकात. तुम्हाला फक्त रुमाल घ्यायचा आहे आणि त्यात बर्फाचे तुकडे टाकायचे आहेत. हे तुमच्या त्वचेवर लावायचे आहेत. हे काम काही काळ सतत करत राहा. यामुळे त्वचेला आराम मिळतो आणि त्वचा आतून थंड होते. त्यामुळे सूज येण्यासोबतच लालसरपणा आणि खाज कमी होते.

Summer Care Tips: या ५ मसाल्यांचे उन्हाळ्यात माफक प्रमाणात सेवन केले पाहिजे!

उन्हाळ्यात त्वचेची जळजळ टाळण्यासाठी, उन्हातून घरी परतल्यानंतर या गोष्टी चेहऱ्यावर लावा. त्वचेला सुखावण्यासोबतच त्वचेचा पोत सुधारण्यासही हे करते. त्यामुळे आता जेव्हाही तुम्ही उन्हातून घरी परताल तेव्हा या गोष्टी तुमच्या त्वचेवर लावा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel