Cooling Foods: गर्मीचा सीजन सुरु झाला आहे. सौम्य हवामानाचे तीव्र उष्णतेत रूपांतर झाले आहे. दिवसेंदिवस कडक उन्हाचा सामना करणे कठीण होत आहे. अशा परिस्थितीत स्वतःला हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे. यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. याशिवाय आपण आपल्या खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घेतली पाहिजे. काही खाद्यपदार्थ आहेत जे तुमच्या शरीराला उष्ण हवामानाचा चांगल्या प्रकारे सामना करण्यास मदत करतात. आज आम्ही तुम्हाला या खाद्यपदार्थांबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही उन्हाळ्यात आवर्जून खाल्ले पाहिजेत.
उन्हाळ्यात उष्णतेपासून आराम देणारे सुपरफ्रूट म्हणजे टरबूज. हे फळ पाणी, इलेक्ट्रोलाइट्स आणि व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी ६ सारख्या जीवनसत्त्वांनी समृद्ध आहे आणि आपल्या शरीराला सर्व आवश्यक पोषक तत्त्वे प्रदान करते.
थंड आणि ताजेतवाने होण्यासाठी पुदीना बेस्ट आहे. उन्हाळ्याच्या सिजनमध्ये पुदिन्याच्या चटण्या, पेय, रायता ते करीपर्यंत विविध पदार्थ बनवून सेवन केले जाऊ शकते. पुदिन्याच्या ताज्या पानांमध्ये पाणी मिसळून मिंट डिटॉक्स वॉटर तयार केले जाते.
ऊर्जेचा आणि पोषक तत्वांचा एक उत्तम स्रोत, उसाचा रस खूप हायड्रेटिंग आणि इलेक्ट्रोलाइट्स आणि कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारख्या खनिजांनी समृद्ध आहे, म्हणून आपल्या आहारात त्याचा समावेश करा.
ताक उन्हाळ्यात प्यायलाच हवे. हे प्रोबायोटिक्सने समृद्ध असलेले आंबवलेले दुग्धजन्य पदार्थ आहे, जे पचन सुधारण्यास आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करते. यात व्हिटॅमिन बी १२ सारखी जीवनसत्त्वे आणि कॅल्शियमसारखी खनिजे देखील असतात.
उष्णतेचा सामना करण्यासाठी तुमच्या शरीराला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट काकडीमध्ये असते. पाण्याव्यतिरिक्त, काकडीत इलेक्ट्रोलाइट्स आणि व्हिटॅमिन सी सारख्या जीवनसत्त्वे देखील भरपूर असतात. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात काकडीचे सेवन नक्कीच करा.
नारळाचे पाणी नियमित सेवन केल्याने रक्तदाब बऱ्याच अंशी कमी होतो आणि उष्णतेपासूनही आराम मिळतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)