मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Care: सर्वेक्षणानुसार ३ पैकी २ लोकांना रोगप्रतिकारशक्ती वाढवण्‍यासाठी असते या व्हिटॅमिन सप्‍लीमेंट्सची आवश्यकता!

Health Care: सर्वेक्षणानुसार ३ पैकी २ लोकांना रोगप्रतिकारशक्ती वाढवण्‍यासाठी असते या व्हिटॅमिन सप्‍लीमेंट्सची आवश्यकता!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Apr 09, 2024 01:53 PM IST

Vitamin Deficiency: मुंबई, दिल्‍ली, कोलकाता, चेन्‍नई, हैदराबाद, बेंगळुरू, कोची, अहमदाबाद व पुणे या नऊ शहरांमधील २,००० हून अधिक व्‍यक्‍तींचे सर्वेक्षण केले.

which vitamin supplements to boost their immune system
which vitamin supplements to boost their immune system (Freepik)

Boost Immune System: महामारीच्‍या प्रादुर्भावानंतर जगभरातील व्‍यक्‍ती आरोग्‍याबाबत अधिक सजग होण्‍यासोबत जीवनशैलीमध्‍ये बदल करण्‍याला अधिक प्राधान्‍य देत आहेत. व्‍यक्‍तींच्‍या आरोग्‍यसंबंधित बदलत्‍या गरजांना उत्तमप्रकारे जाणून घेण्‍यासाठी अ‍ॅबॉट या जागतिक हेल्‍थकेअर कंपनीने आयपीएसओएससोबत सहयोगाने त्‍यांचे भारतभरातील सर्वेक्षण 'हेल्‍दी लिव्हिंग: द रोल ऑफ व्हिटॅमिन सी'च्‍या निष्‍पत्तींना सादर केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काय सांगते सर्वेक्षण?

या सर्वेक्षणामधून निदर्शनास आले की, १० पैकी जवळपास ७ व्‍यक्‍तींचे आरोग्‍य व रोगप्रतिकारशक्‍ती उत्तम असण्‍यासोबत ऊर्जा पातळी उच्‍च आहे, तसेच कोणत्‍याही त्रासाशिवाय दररोज व्‍यायाम करतात. बहुतांश व्‍यक्‍ती उत्तम आरोग्‍यासाठी व्हिटॅमिन सी पातळ्या योग्‍य प्रमाणात राखण्‍याचा प्रयत्‍न देखील करतात. व्हिटॅमिन सी शरीराची विविध कार्ये उत्तम ठेवण्‍यासाठी आवश्‍यक सूक्ष्‍म पौष्टिक घटक आहे, तसेच व्हिटॅमिन सी चे अनेक आरोग्‍यदायी फायदे देखील आहेत. या सर्वेक्षणातील निष्‍पत्तींमधून व्‍यक्‍तींना व्हिटॅमिन सी चे माहित असलेले महत्त्व आणि त्‍यांच्‍या दैनंदिन नित्‍यक्रमामध्‍ये कशाप्रकारे व्हिटॅमिन सीचा समावेश करतात याबाबत माहिती निदर्शनास आली.

अ‍ॅबॉट इंडियाच्‍या मेडिकल अफेअर्सचे असोसिएट डायरेक्‍टर डॉ. कार्तिक पीतांबरन म्‍हणाले, ''व्हिटॅमिन सी मुळे व्‍यक्‍तीची रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यास मदत होते. व्हिटॅमिन सी युक्‍त सप्‍लीमेंशन श्‍वसनविषयक आजारांना प्रतिबंध व उपचार करण्‍यासाठी ओळखले जाते आणि त्‍याचे अनेक आरोग्‍यदायी फायदे आहेत. आमच्‍या सर्वेक्षणामधून एकूण आरोग्‍य उत्तम राखण्‍यामध्‍ये व्हिटॅमिन सीची भूमिका निदर्शनास येते.''

Sleep Disorder: निद्रानाशची समस्या आहे? फॉलो करा हे आयुर्वेदातील हे उपाय!

''व्हिटॅमिन सीचे अनेक आरोग्‍यदायी फायदे आहेत, जसे शरीराची रोगप्रतिकारशक्‍ती व हाडे मजबूत करते, रक्‍तामध्‍ये लोहाचे शोषण वाढवते, जखम लवकर बरी होण्‍यास मदत होते, हिरड्या आरोग्‍यदायी राहतात. म्हणून, व्हिटॅमिन सीच्‍या कमतरतेमुळे अपूर्ण पोषण मिळते,'' असे मुंबईतील सुचक हॉस्पिटलचे कन्‍सल्टिंग फिजिशियन व कार्डियोलॉजिस्‍ट डॉ. केतन मेहता म्‍हणाले. ते पुढे म्‍हणाले, ''व्हिटॅमिन सीचे सतत सेवन केल्‍यामुळे रोगप्रतिकारशक्‍ती मजबूत होण्‍यासह मधुमेह सारख्‍या असंसर्गजन्‍स आजारांनी पीडित व्‍यक्‍तींना फायदा देखील होतो, ज्‍यांना कदाचित उच्‍च प्रमाणात व्हिटॅमिन सी ची गरज भासू शकते.''

'हेल्‍दी लिव्हिंग: द रोल ऑफ व्हिटॅमिन सी' सर्वेक्षण

आयपीएसओएसने मुंबई, दिल्‍ली, कोलकाता, चेन्‍नई, हैदराबाद, बेंगळुरू, कोची, अहमदाबाद व पुणे या नऊ शहरांमधील २,००० हून अधिक व्‍यक्‍तींचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाच्‍या काही प्रमुख निष्‍पत्ती पुढीलप्रमाणे:

• निदर्शनास आलेले फायदे

> ५२ टक्‍के प्रतिसादक म्‍हणाले की, पावसाळा व हिवाळ्यादरम्‍यान व्हिटॅमिन सी सप्‍लीमेंट्सचे सेवन केल्‍यामुळे आजारी पडण्‍याचे प्रमाण कमी झाले.

> ६१ टक्‍के महिलांना व्हिटॅमिन सी आजारामधून लवकर बरे करण्‍यामध्‍ये गुणकारी असल्‍याचे आढळून आले.

Bandages Causing Cancer: बँडेजपासून कर्करोग होऊ शकतो? जाणून घ्या काय सांगतो अभ्यास!

• समजण्‍यात आलेले फायदे

> जवळपास ६० टक्‍के प्रतिसादकांनी (५० टक्‍के नॉन-सप्‍लीमेंट युजर्ससह) व्हिटॅमिन सीमुळे आजारामधून लवकर बरे होण्‍यास मदत झाल्‍याचे सांगितले.

> ६५ टक्‍के प्रतिसादकांना वाटते की, व्हिटॅमिन सप्‍लीमेंट्स एकूण आरोग्‍य उत्तम राखण्‍यामध्‍ये मदत करतात आणि ५२ टक्‍के प्रतिसादकांचे मत आहे की व्हिटॅमिन सी हाडांचे व सांध्‍यांचे आरोग्‍य उत्तम राखण्‍यास मदत करू शकते.

> ७३ टक्‍के प्रतिसादक पुरेशा प्रमाणात पाणी पितात आणि आजारामधून लवकर बरे होण्‍यासाठी संतुलित आहाराचे सेवन करतात.

• व्हिटॅमिन सीच्‍या कमी सेवनाचे परिणाम

> ६० टक्‍के प्रतिसादकांचा विश्‍वास आहे की, व्हिटॅमिन सीच्‍या कमतरतेमुळे रोगप्रतिकारशक्‍ती कमी होते.

> ३६ टक्‍के प्रतिसादकांचा विश्‍वास आहे की, सीच्‍या कमतरतेमुळे आजारामधून बरे होण्‍यास विलंब होतो.

डॉ. केतन मेहता पुढे म्‍हणाले, ''या निष्‍पत्ती व्हिटॅमिन सी आणि रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्यामध्‍ये व संसर्गांशी लढण्‍यामध्‍ये साह्य करण्‍यामधील त्‍यांच्‍या भूमिकेवरील संशोधन अभ्‍यासांशी सुसंगत आहेत. दैनंदिन आहारामध्‍ये व्हिटॅमिन सीचा समावेश केल्‍याने व्‍यक्‍तींना रोगप्रतिकारशक्‍ती प्रबळ राखत आरोग्‍यदायी राहण्‍यास मदत होऊ शकते.''

WhatsApp channel

विभाग