Sleep Disorder: निद्रानाशची समस्या आहे? फॉलो करा हे आयुर्वेदातील हे उपाय!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Sleep Disorder: निद्रानाशची समस्या आहे? फॉलो करा हे आयुर्वेदातील हे उपाय!

Sleep Disorder: निद्रानाशची समस्या आहे? फॉलो करा हे आयुर्वेदातील हे उपाय!

Apr 08, 2024 11:41 PM IST

Ayurveda For Insomnia: निद्रानाशेचे निराकरण करण्‍यासाठी सर्वसमावेशक दृष्टिकोनाची गरज आहे.

Having trouble sleeping Follow these remedies in Ayurveda
Having trouble sleeping Follow these remedies in Ayurveda (freepik)

Health Care: आधुनिक जीवनशैलीमुळे विविध आरोग्‍यविषयक समस्‍यांचा सामना करावा लागत आहे, ज्‍यापैकी एक म्‍हणजे निद्रानाशेचे वाढते प्रमाण. कामाचे व्‍यस्‍त वेळापत्रक, सतत डिजिटल डिवाईसेसमध्‍ये गुंतून राहणे आणि उच्‍च तणाव अशा घटकांमुळे झोपेचा हा आजार सामान्‍य होत आहे. निद्रानाशेचा व्‍यक्‍तींवरील परिणाम दिसून येऊ शकतो, जसे दिवसा थकवा जाणवणे, अवधान न लागणे आणि मूड उत्‍साहित न राहणे. आज समाजात व्‍यस्‍त व उत्‍पादनक्षम जीवनशैलीला अधिक प्राधान्‍य दिले जात असताना अपुऱ्या झोपेचे परिणाम प्रकर्षाने दिसून येत आहेत.

निद्रानाशेचे निराकरण करण्‍यासाठी सर्वसमावेशक दृष्टिकोनाची गरज आहे, ज्‍यामध्‍ये पुरेशी झोप, तणाव व्‍यवस्‍थापन तंत्रे आणि समस्‍येच्‍या मूळ कारणाचे निराकरण करण्‍यासाठी आयुर्वेदाचा वापर यांचा समावेश आहे. आयुर्वेदामध्‍ये विशेष आहार, शांतचित्त करणारी दिनचर्या आणि हर्ब्‍सचा वापर केला जातो, ज्‍यामुळे उत्तम झोप मिळण्‍यास मदत होते. म्‍हणून, हेम्‍पस्‍ट्रीट येथील वरिष्‍ठ आयुर्वेद तज्ञ डॉ. पूजा कोहली निद्रानाशेने पीडित व्‍यक्‍तींसाठी काही आयुर्वेदिक टिप्‍स सांगत आहेत.

Autism: ऑटिझमची लक्षणं काय आहेत? पालकांनी मुलांच्या या गोष्टींकडे लक्ष द्या!

● रात्री झोपण्‍यापूर्वी नित्‍यक्रम निर्धारित करा

 दररोज रात्री शांतचित्त होण्‍यासाठी १० ते २० मिनिटे चिंतन करा. तिळाचे तेलाने किंवा खोबरेल तेलाने पायांना मसाज करा, ज्‍यामुळे तणाव कमी होतो आणि रक्‍ताभिसरण वाढते. रात्री झोपण्‍यापूर्वी ५ ते १० मिनिटे 'नाडी शोधन प्रणायाम' म्‍हणजेच नाकाने दीर्घ श्‍वासोच्‍छवास करा, ज्‍यामुळे मज्जासंस्‍था शांत राहते आणि उत्तम झोप लागते.

झोपण्‍याची वेळ निश्चित करा

 झोपेची वेळ निश्चित असणे हे झोपेचा दर्जा सुधारण्‍यासाठी आवश्‍यक आहे. झोपेची वेळ निश्चित करण्‍यासह सकाळी उठण्‍याची वेळ देखील निश्चित करा. याव्‍यतिरिक्‍त झोपेण्‍यापूर्वी ३० मिनिटे फोन्‍सचा वापर करू नका. सुरूवातीच्‍या टप्‍प्‍यामध्‍ये वीकेण्‍ड्ससह ३० दिवस निर्धारित केलेल्‍या वेळी झोपण्‍याचा प्रयत्‍न करा, ज्‍यामुळे उत्तम झोप मिळण्‍यास मदत होईल.

 आयुर्वेद संसाधनांचा खजिना आहे. अश्वगंधा, ज्येष्ठमध, कॅमोमाइल, हिबिस्कस यासह अनेक औषधी वनस्पती मज्जासंस्था शांत करण्यासह उत्तम झोप मिळण्‍यास मदत करतात. झोपण्यापूर्वी अश्वगंधासोबत कोमट दूध प्या. याव्यतिरिक्त, वैद्यकीय देखरेखीखाली विजया (कॅनॅबिस) सारख्या औषधी वनस्पतींचे सेवन केले जाऊ शकते, ज्‍यामुळे झोप सुधारण्यास मदत होते.

● आरोग्‍यदायी आहाराचे सेवन करा

हलके, सहजपणे पचन होणारा आहार पचनशक्‍ती वाढवते आणि झोपेच्‍या दर्जावर सकारात्‍मक परिणाम करतो. आयुर्वेदात सर्केडियन चक्रासह (Circadian Cycle) जेवण करण्‍याचा आणि रात्रीचे जेवण सायंकाळी ७ पर्यंत करण्‍याचा उल्‍लेख आहे. पण, हे शक्‍य नसेल तर रात्रीचे जेवण व झोपण्‍याची वेळ यामध्‍ये किमान ३ तासांचे अंतर ठेवा.

Whats_app_banner