मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  On This Day: आजच्या दिवशी मास्टर ब्लास्टरने १०० वं शतक झळकवत रचला इतिहास!

On This Day: आजच्या दिवशी मास्टर ब्लास्टरने १०० वं शतक झळकवत रचला इतिहास!

Mar 16, 2023, 11:33 AM IST

    • History of 16 March: आजच्या दिवशी क्रिकेट विश्वास इतिहास रचला गेला. सचिन तेंडूलकर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये १०० शतकं करणारे पहिले खेळाडू ठरले.
१६ मार्चचा इतिहास (Freepik)

History of 16 March: आजच्या दिवशी क्रिकेट विश्वास इतिहास रचला गेला. सचिन तेंडूलकर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये १०० शतकं करणारे पहिले खेळाडू ठरले.

    • History of 16 March: आजच्या दिवशी क्रिकेट विश्वास इतिहास रचला गेला. सचिन तेंडूलकर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये १०० शतकं करणारे पहिले खेळाडू ठरले.

16 March Today Historical Events: १६ मार्च हा दिवस क्रिकेट प्रेमींसाठी खास आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १०० वे शकत केले होते. त्यांनी हे शतक २०१२ मध्ये बांग्लादेश विरुद्ध केले असून, ते पहिले खेळाडू ठरले. याशिवाय १६ मार्च हा राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात १९९५ पासून हा दिवस साजरा केला जात आहे. या दिवशी प्रथमच तोंडावाटे पोलिओची लस देण्याती आली होती.

ट्रेंडिंग न्यूज

Travel in May: मे महिन्यात फिरण्यासाठी बेस्ट आहेत ही ठिकाणं, तुमची सुट्टी होईल संस्मरणीय

Mother's Day Recipe: आईसाठी बनवा टेस्टी ड्राय केक, अंड्याशिवायही बनेल सॉफ्ट आणि स्पॉन्जी

Cancer Study: तुमच्या कारमध्ये असू शकतात कर्करोग निर्माण करणारे घटक, अभ्यासात आले समोर

Dal Tadka Recipe: चव आणि भूक दोन्ही वाढवते ढाबा स्टाईल दाल तडका, नोट करा पंजाबी रेसिपी

१६ मार्चशी संबंधित भारतीय इतिहास

१५२७ - खानवाच्या लढाईत बाबरने राणा संगाचा पराभव केला.

१६९३ - इंदूरच्या होळकर घराण्याचे प्रवर्तक मल्हारराव होळकर यांचा जन्म झाला.

१८४६ - पहिल्या अँग्लो-शीख युद्धाचा परिणाम म्हणून अमृतसरच्या तहावर स्वाक्षरी करण्यात आली. अमृतसर करारानुसार १८४६ मध्ये काश्मीरचा अधिकार जम्मूचा हिंदू राजा गुलाबसिंग याच्याकडे सोपवण्यात आला.

१९०१ - गांधींचे अनुयायी असलेले स्वातंत्र्यसैनिक पोट्टी श्रीरामुलू यांचा जन्म झाला.

१९०६ - भारतातील सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ आणि हिंदी साहित्यिक अंबिका प्रसाद दिव्या यांचा जन्म झाला.

१९१६ - हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक आणि चित्रपट निर्माते दयाकिशन सप्रू यांचा जन्म झाला.

१९४७ - प्रसिद्ध कवी, साहित्यिक अयोध्या सिंह उपाध्याय यांचे निधन झाले.

१९५५ - प्रसिद्ध हिंदी साहित्यिक विजयानंद त्रिपाठी यांचे निधन झाले.

१९६६ - अमेरिकेने "जेमिनी ८" मानवयुक्त अंतराळयान प्रक्षेपित केले.

१९७८ - अमेरिकेने नेवाडा येथे अणुचाचणी केली.

१९९७ - नवज्योत सिंग सिद्धूने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना आपल्या कसोटी कारकिर्दीतील एकमेव द्विशतक झळकावले

२००५ - संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस कोफी अन्नान यांनी UNCTAD चे नवीन अध्यक्ष म्हणून सुपचाई पणिचपाकडी यांची नियुक्ती केली.

२००८ - परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तानात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या भारतीय नागरिक सरबजीत सिंगच्या डेथ वॉरंटवर स्वाक्षरी केली.

२०१२ - भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके करणारा पहिला खेळाडू ठरला.

(वरच्या लेखात काही निवडक घटना दिल्या आहेत. या खेरीज भारतीय इतिहासात आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या होत्या.)

विभाग