मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chanakya Niti: बुद्धिमान व्यक्तीला या परिस्थितीत करावा लागतो अडचणींचा सामना

Chanakya Niti: बुद्धिमान व्यक्तीला या परिस्थितीत करावा लागतो अडचणींचा सामना

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 16, 2023 10:54 AM IST

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या धोरणांमध्ये जीवनाशी संबंधित अनेक पैलूंचे वर्णन केले आहे. आजचे चाणक्य नीती काय सांगते जाणून घ्या.

चाणक्य नीती
चाणक्य नीती

Acharya Chanakya: जीवनात कोणत्या समस्या येतील हे सांगणे कठीण आहे. परंतु आचार्य चाणक्य हे एक महान पुरुष होते, त्यांनी त्यांच्या नितीशास्त्र या ग्रंथात जीवनाशी संबंधित अनेक पैलूंचे तपशीलवार वर्णन केले आहे. निती शास्त्रामध्ये वर्णन केलेली धोरणे आजही प्रासंगिक आहेत. या धोरणांचा अवलंब करून लोक सुखी जीवन जगण्याबरोबरच प्रगती साधू शकतात. असे म्हटले जाते की चाणक्याची धोरणे पाळणे कठीण आहे. आचार्य चाणक्यानेही आपल्या नीतीमध्ये बुद्धिमान व्यक्तींबद्दल सांगितले आहे. एका श्लोकात, आचार्य समजावून सांगतात की एखाद्या ज्ञानी व्यक्तीला कोणत्या परिस्थितीत संकटांना तोंड द्यावे लागते. आजचे चाणक्य नीती काय सांगते ते जाणून घेऊया.

आचार्य चाणक्य सांगतात की, ज्ञानी पुरुषाला मूर्ख शिष्याला उपदेश करून, दुष्ट स्त्रीचे पालन पोषण करून, धनाची हानी करून आणि दुःखी माणसाशी व्यवहार करून संकटांना सामोरे जावे लागते.

- चाणक्य म्हणतात की मूर्ख माणसाला ज्ञान देऊन काही फायदा होत नाही. फक्त सज्जन आणि बुद्धिमान लोकांनाच याचा त्रास होतो. उदाहरणार्थ सुगरण आणि माकडाची गोष्ट आठवत असेल. मूर्ख माकडाला घर बांधण्याचा सल्ला देऊन सुगरण आपले घरटे गमावते. त्याच प्रमाणे दुष्ट व कामचुकार स्त्रीचे पालन पोषण करून सज्जन व बुद्धिमान पुरुषालाच दु:ख प्राप्त होते.

- चाणक्य सांगतात की ज्या व्यक्तीला अनेक रोग आहेत आणि ज्याची संपत्ती नष्ट झाली आहे अशा व्यक्तीशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवणे बुद्धिमान लोकांसाठी हानिकारक असू शकते. अनेक रोगांनी ग्रासणे म्हणजे संसर्गजन्य रोग. अनेकांना संसर्गजन्य रोग होतात, त्यांच्या संगतीमुळे तुम्हालाही संसर्ग होण्याचा धोका असतो.

- ज्या लोकांचे पैसे गमावले आहेत किंवा दिवाळखोर झाले आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. अशा लोकांना दुःखातून सावरणे कठीण आहे.

- जे खरोखर दुःखी आहेत आणि ज्यांना सावरायचे आहे त्यांना आधार दिला पाहिजे. कारण दुःखापासून फक्त स्वार्थीच वाचतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग