Crispy Rice Puri Recipe: लहान मुले असोत वा मोठे, रात्रीच्या जेवणात रोज काहीतरी वेगळे पदार्थांची मागणी असते. अशा परिस्थितीत रोज काय स्पेशल पदार्थ बनवायचा हा महिलांसमोर मोठा प्रश्न असतो. शिवाय ते कमी वेळेत तयार होऊन त्रासही कमी झाला पाहिजे. तुम्हाला पण रोज काय बनवायचे हा प्रश्न असेल तर बटाट्याच्या भाजीसोबत तुम्ही तांदळाच्या पीठाची पुरी बनवू शकता. बटाट्याची भाजी अनेकदा मुलांना आवडते. त्यासोबत कुरकुरीत तांदळाच्या पुर्या बनवून तुम्ही याला स्पेशल टच देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया कुरकुरीत तांदळाच्या पुर्या बनवण्याची रेसिपी.
क्रिस्पी तांदूळ पुरी बनवण्यासाठी साहित्य
- ३ उकडलेले बटाटे
- १ वाटी तांदळाचे पीठ
- २ चमचे आले-हिरवी मिरची पेस्ट
- १ टीस्पून मीठ
- १ टीस्पून जिरे
- १/४ टीस्पून हळद
- १ टीस्पून ओवा
- १ टीस्पून कसुरी मेथी
- १ टीस्पून चिली फ्लेक्स
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- अर्धा टीस्पून तेल
कुरकुरीत तांदूळ पुरी कशी बनवण्याची पद्धत
क्रिस्पी तांदूळ पुरी बनवण्यासाठी ३ उकडलेले बटाटे घ्या आणि एका मोठ्या भांड्यात मॅश करा. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते किसू देखील शकता. जेणेकरुन ते चांगले मॅश होतील आणि त्यात तुकडे राहणार नाही. आता हे बटाटे तांदळाच्या पिठात मिक्स करा. सोबत आले-मिरचीची पेस्ट घाला. हळद, मीठ, जिरे, ओवा, कसुरी मेथी हाताने कुस्करून टाका. त्यात चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीरही घाला.
आता बटाट्याच्या मदतीने तांदळाचे पीठ मळून घ्या. पुरीसाठीचे पीठ जास्त कडक किंवा मऊ नसावे. पीठ असे असले पाहिजे की ते पोळी बनवून सहज तयार करता येईल. आता हे पीठ फक्त बटाट्याच्या मदतीने मळून घ्या. नंतर दहा मिनिटे ठेवा. ठरलेल्या वेळेनंतर गॅसवर एका पातेल्यात तेल टाकून ते गरम करून घ्या. हाताला थोडे तेल लावून पीठाचे गोळे करा. नंतर थोडी जाड पुरी लाटून तेलात टाकावी. सोनेरी होईपर्यंत तळा. बटाट्याच्या भाजीसोबत गरमागरम सर्व्ह करा.