मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dal Tadka Recipe: चव आणि भूक दोन्ही वाढवते ढाबा स्टाईल दाल तडका, नोट करा पंजाबी रेसिपी

Dal Tadka Recipe: चव आणि भूक दोन्ही वाढवते ढाबा स्टाईल दाल तडका, नोट करा पंजाबी रेसिपी

May 08, 2024, 08:41 PM IST

    • Punjabi Dal Tadka Recipe: डाळची चव त्यात लावलेल्या तडक्यामध्ये लपलेली असते. जर तुम्हालाही घरच्या घरी ढाब्यासारखी टेस्टी दाल चाखायची असेल तर ही पंजाबी दाल तडका रेसिपी ट्राय करा.
Dal Tadka Recipe: चव आणि भूक दोन्ही वाढवते ढाबा स्टाईल दाल तडका, नोट करा पंजाबी रेसिपी (freepik)

Punjabi Dal Tadka Recipe: डाळची चव त्यात लावलेल्या तडक्यामध्ये लपलेली असते. जर तुम्हालाही घरच्या घरी ढाब्यासारखी टेस्टी दाल चाखायची असेल तर ही पंजाबी दाल तडका रेसिपी ट्राय करा.

    • Punjabi Dal Tadka Recipe: डाळची चव त्यात लावलेल्या तडक्यामध्ये लपलेली असते. जर तुम्हालाही घरच्या घरी ढाब्यासारखी टेस्टी दाल चाखायची असेल तर ही पंजाबी दाल तडका रेसिपी ट्राय करा.

Dhaba Style Dal Tadka Recipe: घरी बनवलेली यलो दाल तडकामध्ये ढाब्यावर मिळणारी दाल तडकाची टेस्ट लोक मिस करतात. पण या मागचे कारण तुम्हाला माहीत आहे का? पिवळी डाळ बनवताना हा प्रश्न तुम्ही स्वतःला अनेकदा विचारला असेल. तुम्हालाही या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असेल खरं तर डाळची चव त्याला लावलेल्या तडकामध्ये लपलेली असते. जर तुम्हालाही घरच्या घरी ढाब्यासारखी चवदार दाल तडका असेल तर ही पंजाबी दाल तडका रेसिपी फॉलो करा.

ट्रेंडिंग न्यूज

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

Onion Pickle: जेवणासोबत सर्व्ह करा टेस्टी कांद्याचे लोणचे, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

High Blood Pressure: अनियंत्रित रक्तदाबामुळे होऊ शकतात या समस्या, वेळीच घ्या काळजी

Health Tips: तेल वारंवार गरम केल्याने वाढतो कर्करोगाचा धोका, आयसीएमआरचा इशारा, किती दिवस जुने तेल वापरता येते?

पंजाबी दाल तडका बनवण्यासाठी साहित्य

- १/२ कप तूर डाळ

- १/४ कप पिवळी मूग डाळ

- २ चमचे तेल

- १/२ कप चिरलेला कांदा

- १ टीस्पून बारीक चिरलेले आले

- १ टीस्पून बारीक चिरलेला लसूण

- १ टीस्पून चिरलेली हिरवी मिरची

- १/२ कप चिरलेला टोमॅटो

- १ टीस्पून धने पावडर

- १/२ टीस्पून हळद

- १ टीस्पून काश्मिरी लाल तिखट

- १ टीस्पून मीठ किंवा चवीनुसार

- १ टेबलस्पून लिंबाचा रस

तडक्यासाठी

- २ चमचे तूप

- १ टीस्पून जिरे

- १/४ टीस्पून हिंग

- २-३ संपूर्ण कोरड्या लाल मिरच्या

- २ चमचे बारीक चिरलेला लसूण

- १ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर

- २ चमचे चिरलेली कोथिंबीर

पंजाबी दाल तडका बनवण्याची पद्धत

पंजाबी दाल तडका बनवण्यासाठी प्रथम तूर डाळ आणि मूग डाळ पाण्याने २ ते ३ वेळा धुवून घ्या. यानंतर डाळ २-३ कप पाण्यात भिजवून बाजूला ठेवा. आता कुकरमध्ये तेल तापायला ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात कांदा टाका आणि हलका तपकिरी होईपर्यंत परता. यानंतर कुकरमध्ये आले आणि लसूण घालून आणखी २ मिनिटे शिजवा. आता टप्प्यात हिरवी मिरची, टोमॅटो, धने पावडर, हळद आणि काश्मिरी लाल मिरची पावडर घालून ५ मिनिटे शिजवा. यानंतर डाळीमधील पाणी काढून टाका आणि एका भांड्यात ३ कप पाणी आणि मीठ घालून चांगले मिक्स करा.

कुकरची आच मध्यम आचेवर ठेवा. यानंतर प्रेशर कुकरचे झाकण बंद करा आणि एक शिटी होईपर्यंत डाळ मोठ्या आचेवर शिजवा. त्यानंतर फ्लेम कमी करा आणि आणखी १० ते १२ मिनिटे शिजवा. यानंतर कुकर आचेवरून काढा आणि प्रेशर स्वतःच सोडू द्या. यानंतर कुकरचे झाकण उघडून कुकरमध्ये लिंबाचा रस घाला आणि डाळ थोडी घट्ट होईपर्यंत रईच्या साहाय्याने नीट मिक्स करा. मीठ तपासा, आवश्यक असल्यास आपण मीठ प्रमाण वाढवू शकता.

आता दाल तडका तयार करा. तडका तयार करण्यासाठी एका छोट्या कढईत मध्यम आचेवर तूप गरम करून त्यात जिरे आणि हिंग घालून ४-५ सेकंद परतून घ्या. आता त्यात कोरडी लाल मिरची आणि लसूण घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. यानंतर गॅस बंद करून त्यात काश्मिरी लाल तिखट घाला. हा तयार तडका कुकरमध्ये टाकून लगेच झाकून ठेवा. दाल नीट मिक्स केल्यानंतर कोथिंबीरने सजवून सर्व्ह करा.

विभाग

पुढील बातम्या