Sandwich Recipe: मुलांसाठी नाश्त्यात बनवा चीज कॉर्न सँडविच, झटपट तयार होते रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Sandwich Recipe: मुलांसाठी नाश्त्यात बनवा चीज कॉर्न सँडविच, झटपट तयार होते रेसिपी

Sandwich Recipe: मुलांसाठी नाश्त्यात बनवा चीज कॉर्न सँडविच, झटपट तयार होते रेसिपी

May 07, 2024 10:02 AM IST

Breakfast Recipe: जर तुम्हाला लहान मुलांसाठी नाश्त्यात काहीतरी टेस्टी बनवायचे असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी चीज कॉर्न सँडविच बनवू शकता. ही रेसिपी पटकन तयार होते.

Sandwich Recipe: मुलांसाठी नाश्त्यात बनवा चीज कॉर्न सँडविच, झटपट तयार होते रेसिपी
Sandwich Recipe: मुलांसाठी नाश्त्यात बनवा चीज कॉर्न सँडविच, झटपट तयार होते रेसिपी (freepik)

Cheese Corn Sandwich Recipe: ब्रेकफास्ट हे दिवसाचे सर्वात महत्वाचे मील आहे. अशा परिस्थितीत हेल्दी ब्रेकफास्ट खाणे खूप गरजेचे आहे. मुलांना नाश्त्यात हेल्दी गोष्टी खायला दिल्यास ते दिवसभर उत्साही राहतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला त्यांना हेल्दी आणि टेस्टी नाश्ता खायला द्यायचा असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी चीज कॉर्न सँडविच बनवू शकता. या सँडविचची चव अप्रतिम आहे आणि ते पटकन तयार केले जाऊ शकते. कॉर्नमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे ते आरोग्यासाठीही चांगले असते. चला तर जाणून घ्या चीज कॉर्न सँडविच कसे बनवायचे

चीज कॉर्न सँडविच बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -

- ८ स्लाइस ब्रेड

- दीड कप उकडलेले स्वीट कॉर्न

- ४ टेबलस्पून बारीक चिरलेली शिमला मिरची

- ४ टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा

- अर्धा कप किसलेले मोझरेला चीज

- १ टीस्पून ठेचलेली काळी मिरी

- मीठ चवीनुसार

- ४ चमचे बटर

चीज कॉर्न सँडविच कसे बनवायचे

हे सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम एका छोट्या भांड्यात उकडलेले स्वीट कॉर्न घ्या आणि त्यात २ टेबलस्पून शिमला मिरची, २ टेबलस्पून कांदा, चीज, काळी मिरी पावडर आणि मीठ घाला. आता सर्व काही चांगले मिक्स करा आणि बाजूला ठेवा. आता ब्रेडच्या स्लाइसवर बटर पसरवा. यानंतर ब्रेड स्लाइसवर २ चमचे तयार केलेले कॉर्न चीज स्टफिंग पसरवा. आता दुसऱ्या ब्रेड स्लाईसवर बटर लावून सँडविच झाकून ठेवा. 

आता तव्यावर बटर पसरून त्यावर सँडविच ठेवून भाजून घ्या किंवा टोस्ट करा. तुमचे टेस्टी चीज कॉर्न सँडविच सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत.

Whats_app_banner