मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Veg Roll: संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा ब्रेडपासून बनलेले व्हेज रोल, सर्वांना आवडेल ही रेसिपी

Veg Roll: संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा ब्रेडपासून बनलेले व्हेज रोल, सर्वांना आवडेल ही रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 06, 2024 07:33 PM IST

Evening Snacks Recipe: संध्याकाळी अचानक पाहुणे आले किंवा तुम्हाला चहासोबत स्नॅक्स काय बनवायचे हा प्रश्न पडला असेल तर अशा स्थितीत ब्रेडपासून बनवलेले हे चविष्ट व्हेज रोल्स तुम्ही पटकन बनवू शकता. पाहा रेसिपी.

Veg Roll: संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा ब्रेडपासून बनलेले व्हेज रोल, सर्वांना आवडेल ही रेसिपी
Veg Roll: संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा ब्रेडपासून बनलेले व्हेज रोल, सर्वांना आवडेल ही रेसिपी

Bread Veg Roll Recipe: बऱ्याचदा घरात पाहुणे येतात आणि अशा वेळी नाश्त्यात काय बनवायचे हा मोठा प्रश्न निर्माण होतो. अशा वेळी संध्याकाळी स्नॅक्समध्ये तुम्ही हे टेस्टी ब्रेड व्हेज रोल बनवू शकता. जर तुम्हाला व्हेज रोल खायला आवडत असेल पण बनवायला अवघड जात असेल तर तुम्ही ब्रेडपासून ते पटकन बनवू शकता. ही रेसिपी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. चला तर मग जाणून घेऊया ब्रेडपासून व्हेज रोल कसा बनवायचा.

ट्रेंडिंग न्यूज

ब्रेड व्हेज रोल बनवण्यासाठी साहित्य

- ७-८ ब्रेड

- अर्धा कप फ्लावर बारीक चिरलेली

- अर्धी कप बीन्स बारीक चिरलेले

- एक-चतुर्थांश कप सिमला मिरची बारीक चिरलेली

- अर्धा कप गाजर बारीक चिरलेले

- अर्धा कप वाटाणे

- अर्धा कप कांदा बारीक चिरलेला

- ५ उकडलेले बटाटे

- एक चमचा लसूण बारीक चिरून

- एक चमचा आले बारीक चिरून

- एक चमचा मोहरी

- कढीपत्ता

- लाल तिखट

- पावभाजी मसाला

- काळी मिरी पावडर

- चाट मसाला

- एक चमचा कसुरी मेथी

- मीठ चवीनुसार

- दोन चमचे तेल

बॅटर बनवण्यासाठी

- एक कप बेसन

- एक चतुर्थांश कप तांदळाचे पीठ

- अर्धा चमचा हळद

- एक टीस्पून ओवा

- मीठ चवीनुसार

- कोथिंबीर

- पाणी

ब्रेड व्हेज रोल बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम तेल गरम करून पॅनमध्ये बारीक चिरलेला लसूण आणि आले परतून घ्या. कढीपत्ता टाकून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परता. कांदा भाजल्यावर त्यात भाज्या घालून शिजवा. शिमला मिरची, बीन्स, गाजर, फ्लॉवर चांगले शिजल्यावर त्यात काळी मिरी पावडर, चाट मसाला, पावभाजी मसाला आणि मीठ घालून मिक्स करा. आता मॅश केलेले उकडलेले बटाटे टाका आणि मिक्स करा. दुसऱ्या बाउलमध्ये बेसन, तांदळाचे पीठ, हळद, ओवा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करा. पाणी घालून पातळ बॅटर तयार करा. आता ब्रेडला लाटण्याच्या मदतीने लाटून पातळ करा आणि त्यावर तयार केलेले मिश्रण ठेवा. बेसन आणि तांदळाचे पीठ यांचे मिश्रण लावून ते नीट चिकटवा. 

आता तयार ब्रेड रोल बॅटरमध्ये टाका आणि सोनेरी होईपर्यंत तळा. तुमचे टेस्टी ब्रेड व्हेज रोल तयार आहे. गरमा गरम सर्व्ह करा.

WhatsApp channel