Bengal Style Aam Pora Sharabt Recipe: उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी फक्त पाणी पुरेसे नाही. तहान शमवण्यासाठी लोक विविध प्रकारचे थंड कोल्ड ड्रिंक्स सुद्धा पितात, जे आरोग्यासाठी चांगले नाही. उन्हाळ्यात लहान मुलांना कोल्ड ड्रिंक्सपासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही त्यांना घरी बनवलेले शरबत देऊ शकता. आम्ही बंगाली स्टाइल आम पोराची रेसिपी सांगत आहोत. पारंपारिक पद्धतीने आम पोरा हे आंबा भाजून बनवला जातो. ही रेसिपी खूप सोपी आणि टेस्टी आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांना सुद्धा आवडेल. चला तर मग जाणून घ्या बंगाल स्टाईल आम पोराची रेसिपी-
- २ कैरी
- १/२ कप साखर
- १ टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर
- १ टीस्पून काळी मिरी पावडर
- १ टीस्पून काळे मीठ
- मूठभर ताजी पुदिन्याची पाने
- बर्फाचे तुकडे
- २ कप थंड पाणी
हे बनवण्यासाठी प्रथम आंबे चांगले धुवा आणि नंतर मंद-मध्यम आचेवर ठेवा. ते सर्व बाजूंनी जळेपर्यंत भाजा. ते चांगले भाजल्यावर गॅसवरून काढून थंड होऊ द्या. नंतर आंब्याची साल काढून एका भांड्यात मऊ गर काढा. आता ब्लेंडरमध्ये भाजलेला आंब्याचा पल्प, साखर, पुदिन्याची ताजी पाने, काळे मीठ, भाजलेले जिरे पूड आणि काळी मिरी घालून ब्लेंड करा. हे मिश्रण एका भांड्यात घाला आणि त्यात थंड पाणी टाका आणि चांगले मिक्स करा.
आता एका ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे आणि पुदिन्याची पाने टाका आणि नंतर ग्लासमध्ये शरबत भरा. तुमचे टेस्टी आम पोरा शरबत तयार आहे. थंडगार सर्व्ह करा.