मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Working Parents, मुलांना घरी एकटं सोडण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की शिकवा!

Working Parents, मुलांना घरी एकटं सोडण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की शिकवा!

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 15, 2023 10:36 PM IST

Parenting Tips: कोणत्याही कारणामुळे मुलाला घरी एकटे सोडताना मुलांच्या सुरक्षिततेची चिंता पालकांना नेहमीच सतावत असते. जर तुमचीही परिस्थिती तशीच असेल तर या गोष्टी मुलांना शिकवा.

पॅरेंटिंग टिप्स
पॅरेंटिंग टिप्स (unsplash)

Things to Teach Your Kids Before Leaving Them Alone at Home: मुलांना वाढवताना अनेकदा काही महत्त्वाच्या कामामुळे पालकांना त्यांना घरी एकटं सोडावं लागतं. अशा प्रकारची समस्या प्रामुख्याने नोकरदार पालकांमध्ये दिसून येते. आई नोकरी करणारी असो वा गृहिणी, कोणत्याही कारणामुळे आपल्या मुलाला घरी एकटे सोडताना तिला नेहमीच आपल्या मुलाच्या सुरक्षिततेची चिंता सतावत असते. जर तुमची परिस्थिती अशीच असेल तर पुढच्या वेळी आपल्या मुलाला घरी एकटे सोडण्यापूर्वी या टिप्स फॉलो करायला विसरू नका.

मुलांना घरी एकटे सोडण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

तुमचा फोन नंबर पाठ करुन घ्या

जर तुमचे मूल स्वत: फोन वापरू शकत असेल तर त्याला घरात एकटे सोडण्यापूर्वी तुमचा नंबर तोंडपाठ करायला किंवा लक्षात ठेवायला सांगा. जेणेकरून कोणतीही गरज किंवा अडचण आल्यास तो तुमच्याशी संपर्क साधू शकेल.

घरात मुलासाठी खाण्याचे पदार्थ ठेवा

मुलाला घरात एकटे सोडण्यापूर्वी त्यांच्यासाठी खाण्याचे पदार्थ ठेवा. असे केल्याने मुलाला भूक लागल्यास तो घरात असलेल्या खाण्या-पिण्याच्या गोष्टी स्वतः वापर करु शकेल.

एलपीजी गॅस बंद करायला विसरू नका

मुलाला घरात एकटे सोडण्यापूर्वी गॅस बंद करण्याची खात्री करा. अनेक वेळा पालक घाईघाईत हे करणे विसरतात. त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडू शकते.

तीक्ष्ण वस्तू मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवा

मुलांना घरी एकटे सोडण्यापूर्वी चाकू, कैची यासारखे धारदार वस्तू मुलांच्या आवाक्याबाहेर आहेत याची खात्री करा. ते मुलांच्या हाताला सहज लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा.

अनोळखी व्यक्तीशी बोलू नका

मुलांना घरी एकटे सोडण्यापूर्वी त्यांना समजावून सांगा की त्यांनी घरात एकटे असताना अज्ञात व्यक्तीशी कोणत्याही प्रकारचे संभाषण करू नये. अनोळखी व्यक्तीशी भेटणे मुलासाठी त्रास होऊ शकतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग