मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  परीक्षेमुळे वाढतोय मुलांचा ताण? पालकांनी करावे हे काम

परीक्षेमुळे वाढतोय मुलांचा ताण? पालकांनी करावे हे काम

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 20, 2023 10:56 PM IST

Parenting Tips: परीक्षेची वेळ सुरू आहे. मुलांना अभ्यास करताना परीक्षेचे आणि मार्कांचे फारसे टेन्शन येऊ नये यासाठी त्यांच्या पालकांनीही सहकार्य करणे गरजेचे असते. ज्यामुळे ते स्ट्रेस टाळू शकतील.

मुलांचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी टिप्स
मुलांचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी टिप्स

Exam Stress In Kids: परीक्षेची वेळ सुरू आहे. बोर्डाच्या परीक्षांसोबतच होम एक्साम सुद्धा सुरू आहेत. अशा परिस्थितीत मुलांवर अभ्यासाचा ताण येतो. मुलांमध्ये अभ्यासाचा ताण असल्याने पालकांनी त्यांचा ताण कमी करणे गरजेचे आहे. जेणेकरून ते अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. जर तुमचे मूलही अभ्यासाबाबत खूप ताण घेत असेल तर अशा प्रकारे त्याला मदत करा.

दबाव आणू नका

मुले आधीच त्यांच्या अभ्यास आणि परीक्षांबाबत तणावाखाली असतात. अशा परिस्थितीत त्यांच्यावर अभ्यासासाठी दबाव टाकण्याऐवजी त्यांना मदत करा. मुलाला अभ्यास आणि परीक्षेच्या तयारीबद्दल जास्त प्रश्न विचारू नका. उलट त्यांना अभ्यासात मदत करा. धडे कसे लक्षात ठेवायचे ते त्यांना समजून सांगा.

मुलांशी बोला

तुम्ही नोकरी करत असाल तर मुलासाठी वेळ काढा. मूल एकटे अभ्यास करत असेल असे नाही. कदाचित तणावामुळे त्याचे मन अभ्यासात लागत नसेल. अशा परिस्थितीत त्याच्याशी संवाद साधण्यासाठी वेळ काढा. त्याला खात्री द्या की परीक्षा चांगली जाईल आणि त्याने टेन्शन घेऊ नये. मुलांना स्कोअर आणि रिझल्टचे टेन्शन आधीच देऊ नका. ज्यामुळे तो सर्व प्रकारच्या मार्कांसाठी तयार होईल.

शांत राहायला शिकवा

परीक्षेमुळे मूल तणावाखाली असेल तर त्याला अभ्यासाच्या मधल्या काळात श्वासोच्छवासाचा व्यायाम करायला शिकवा. असे केल्याने त्याला गोष्टी लक्षात राहण्यास आणि त्याचे मन फ्रेश ठेवण्यास मदत होईल.

आहाराची पूर्ण काळजी घ्या

परीक्षेच्या काळात मुलांच्या आहाराची पूर्ण काळजी घ्या. त्याला उर्जा देणारे आणि आळस दूर करणारे अन्न द्या. फळे-भाज्या, तृणधान्ये, स्प्राउट्स. आहारात अंडी, दूध, ड्रायफ्रूट्स दिल्यास त्याच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग