मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  परीक्षेच्या काळात असे ठेवा मुलांचे टाइम-टेबल, खेळण्यासाठीही काढा वेळ

परीक्षेच्या काळात असे ठेवा मुलांचे टाइम-टेबल, खेळण्यासाठीही काढा वेळ

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 15, 2023 08:14 PM IST

Parenting tips: मुलांची परीक्षा सुरु झाली की त्यांच्यासोबत त्यांचे पालक सुद्धा टेन्शनमध्ये असतात. पण या काळात मुलांवर प्रेशर टाकण्याऐवजी योग्य टाइम टेबल बनवा. ज्यात अभ्यासापासून खेळण्यापर्यंत वेळ असेल. यामुळे मुले मनापासून अभ्यास करु शकतात.

परीक्षेच्या काळात मुलांचे वेळापत्रक
परीक्षेच्या काळात मुलांचे वेळापत्रक (unsplash)

Study Time Table in Exam Time For Kids: फेब्रुवारी महिना म्हणजे मुलांच्या अंतिम परीक्षांचा काळ. सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या. तर इतर मुलांच्या देखील परीक्षा काही दिवसात सुरु होतील. या काळात प्रत्येक घरात तणावाचे वातावरण असते. मुलांसोबत त्यांचे पालकही रात्रंदिवस मेहनत करून मुलांना परीक्षेची तयारी करायला लावतात. पण या दरम्यान परीक्षेच्या टेन्शनमुळे आपण मुलांना वेठीस धरत आहोत, याचा पालकांना विसर पडतो. जर तुम्ही परीक्षेच्या वेळी मुलांसाठी वेळापत्रक तयार करत असाल तर नक्कीच मुलांसाठी त्यात आराम करण्यासाठी आणि खेळण्यासाठी वेळ काढा. जेणेकरून त्यांचे मन चांगल्या पद्धतीने अभ्यासात गुंतले जाईल. जर तुम्ही मुलाचे टाइम टेबल बनवत असाल तर या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा.

ट्रेंडिंग न्यूज

- मुलाचे टाइम टेबल बनवताना त्याच्या क्षमतांची काळजी घ्या. जेव्हा त्याचे मन वाचनात गुंतलेले असते त्याच वेळी मुलाला वाचण्यास सांगा.

- जर मुलाला रात्री झोपायचे असेल तर त्याला सकाळी अभ्यास करण्यास सांगा. दुसरीकडे, जर मुलाला रात्री अभ्यास करायचा असेल, तर त्याला सकाळी अभ्यास करण्यासाठी वेळापत्रक बनवू नका.

- टाइम टेबल बनवल्यानंतर त्याला त्याचे पालन करण्यास सांगा.

- वेळापत्रकानुसार अभ्यासासोबतच त्याच्या खेळासाठीही वेळ निश्चित करा. जेणेकरून त्याला काही काळ खेळण्याचा आनंद घेता येईल.

- मुलाला आराम करण्याची देखील संधी द्या. जेणेकरून तो तणावाखाली येऊ नये आणि परीक्षेची चांगली तयारी करू शकेल.

- परीक्षेच्या वेळापत्रकानुसार मुलांच्या अभ्यासाचे वेळापत्रक बनवा. ज्या विषयाचा पेपर दोन दिवसांनी आहे त्यासाठी जास्त वेळ आणि १० दिवसांनी पेपरसाठी कमी वेळ ठेवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग