मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: मुलांमध्ये वाढतोय परीक्षेचा ताण? करायला लावा 'हे' ५ योगासन, अभ्यासात लागेल मन

Yoga Mantra: मुलांमध्ये वाढतोय परीक्षेचा ताण? करायला लावा 'हे' ५ योगासन, अभ्यासात लागेल मन

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 18, 2023 08:18 AM IST

Yoga For Children In Exam Time: अनेक वेळा मुलांना त्यांनी केलेला अभ्यास आठवत नाही आणि ते जास्त ताण घेऊ लागतात. लाख प्रयत्न करूनही तुमचे मूल अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नसेल, तर त्याला रोज योगाभ्यास करायला लावा.

भुजंगासन
भुजंगासन (pexels)

Yoga For Concentration And Stress Relief: फेब्रुवारी महिन्यापासून परीक्षांची प्रक्रिया सुरू होते. बोर्डाच्या परीक्षांसोबतच शाळेतही परीक्षा सुरू होतात. अशा परिस्थितीत दहावी-बारावीच्याच नव्हे, तर प्रत्येक वर्गातील मुलांना परीक्षेचे टेन्शन येते. त्यामुळे अनेक वेळा मुलांना त्यांनी केलेला अभ्यास, त्यांनी काय वाचले हे आठवत नाही आणि ते जास्त टेन्शन घेऊ लागतात. बरेच प्रयत्न करुनही तुमचे मूल लक्ष केंद्रित करू शकत नसेल, तर त्याला रोज योगाभ्यास करायला लावा. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम योगा केल्याने मनातील एकाग्रता वाढते आणि तणाव कमी होतो.

ट्रेंडिंग न्यूज

ताडासन

ताडासन मुलांसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे मुलांचे पोश्चर तर सुधारतेच पण उंचीही वाढते. त्याच बरोबर मुलांचे मानसिक आरोग्यही नीट राहण्यास मदत होते.

भुजंगासन

योगाच्या या आसनामुळे मुलांमध्ये समन्वय सुधारतो. तसेच शरीर लवचिक होते. भुजंगासन मन एकाग्र करण्यात आणि बुद्धी तल्लख करण्यात खूप मदत करते. मुलांना रोज या योगासनांचा सराव करायला लावला पाहिजे.

पर्वतासन

परीक्षेची वेळ येताच मुलांची बाहेरची कामे पूर्णपणे थांबतात. अशा स्थितीत शरीर अजिबात काम करत नाही. शरीर आणि मन चांगले कार्य करण्यासाठी आणि तणावग्रस्त होऊ नये यासाठी योग आवश्यक आहे. पर्वतासन केल्याने शरीर संतुलित होण्यास आणि योग्य प्रयत्न करण्यास मदत होते.

पद्मासन

पद्मासनाचा सराव केल्याने मन एकाग्र राहण्यास मदत होते. जेव्हा मुले सतत बसून वाचतात तेव्हा त्यांना पाठ दुखण्याची तक्रार असते. अशा परिस्थितीत पद्मासन केल्याने मुलांना पाठदुखीपासून आराम मिळेल आणि मन एकाग्र होईल.

पादहस्तासन

ज्या मुलांना जास्त ताण आणि अभ्यासाची चिंता असते आणि डोकेदुखी असते त्यांनी पादहस्तासन आसन करावे. त्यामुळे मन शांत राहण्यास मदत होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग