मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Happy Birthday Rajinikanth: 'थलायवा' स्वत:ला फिट ठेवण्यासाठी या गोष्टींना हातही लावत नाही!

Happy Birthday Rajinikanth: 'थलायवा' स्वत:ला फिट ठेवण्यासाठी या गोष्टींना हातही लावत नाही!

Dec 12, 2022, 09:54 AM IST

    • Rajinikanth Birthday Special: साऊथचे सुपरस्टार रजनीकांत आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. वयाच्या ७२ व्या वर्षीही रजनीकांत केवळ हिट चित्रपटच देत नाहीत तर ते फिटही आहेत. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी रजनीकांत आपल्या आहाराची खूप काळजी घेतात.
हॅप्पी बर्थडे रजनीकांत (HT)

Rajinikanth Birthday Special: साऊथचे सुपरस्टार रजनीकांत आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. वयाच्या ७२ व्या वर्षीही रजनीकांत केवळ हिट चित्रपटच देत नाहीत तर ते फिटही आहेत. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी रजनीकांत आपल्या आहाराची खूप काळजी घेतात.

    • Rajinikanth Birthday Special: साऊथचे सुपरस्टार रजनीकांत आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. वयाच्या ७२ व्या वर्षीही रजनीकांत केवळ हिट चित्रपटच देत नाहीत तर ते फिटही आहेत. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी रजनीकांत आपल्या आहाराची खूप काळजी घेतात.

Rajinikanth diet and fitness secret: भारताचे ज्येष्ठ अभिनेते सुपरस्टार रजनीकांत यांचा आज म्हणजेच १२ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. रजनीकांतचा चित्रपटांमध्ये प्रवेश करण्याचा प्रवास सोपा नव्हता, पण सुरुवातीपासूनच तो हिरो बनण्याचे स्वप्न पाहत असे. घरच्या परस्थितीमुळे त्यांनी कुलीपासून त्यांनी कंडक्टरचे काम केले. स्वप्न पूर्ण करण्याच्या भावनेने त्यांना चित्रपटसृष्टीकडे नेले आणि ते एक मेगा स्टार बनले. वयाच्या ७२ व्या वर्षीही रजनीकांत केवळ हिट चित्रपटच देत नाहीत तर ते अगदी फिटही आहेत. २.० असो किंवा दरबार, प्रत्येक चित्रपटात त्याने आपल्या अभिनयानेच नाही तर आपल्या फिटनेसनेही चाहत्यांची मने जिंकली आहेत. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी रजनीकांत आपल्या आहाराची कशी काळजी घेतात ते जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

Fitness Mantra: या व्यायामांनी तपासा तुमची फिटनेस लेव्हल, काही मिनिटांत कळेल किती फिट आहात तुम्ही

International No Diet Day: का साजरा केला जातो इंटरनॅशनल नो डाएट डे, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Mango Storage Tips: पिकलेले आंबे होणार नाही लवकर खराब, फक्त साठवताना लक्षात ठेवा या गोष्टी

Jaljeera Recipe: उन्हाळ्यात शरीराला कूल ठेवेल थंडगार जलजीरा, बनवण्यासाठी नोट करा रेसिपी

डाइट आणि रूटीन

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रजनीकांत पहाटे ५ वाजता उठतात. यानंतर, ते किमान एक तास जॉगिंग करतो आणि नंतर संध्याकाळी चालतात. इतकंच नाही तर रजनीकांत नियमित मेडिटेशनही करतात.

या गोष्टी सेवन करत नाहीत

वयाची ४० ओलांडल्यानंतर रजनीकांत यांनी साखर आणि दूध, दही आणि तूप यांसारखे दुग्धजन्य पदार्थ टाळण्यास सुरुवात केली.

झोपेच्या बाबतीत तडजोड करत नाहीत

रजनीकांत यांना पुरेशी झोप लागते. तंदुरुस्त राहण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगली झोप. तसेच, शरीराला पूर्ण विश्रांती मिळावी, असे त्यांचे मत आहे.

दिनक्रमात पोहण्याचा समावेश

इंडिया टुडेच्या लेखानुसार, पोहणे हे रजनीकांतच्या फिटनेसचेही रहस्य आहे. ते नियमित पोहतो. अनेकवेळा ते शूटिंगला जाण्यापूर्वीच पोहायला जातात.

अभिनेते रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजी राव गायकवाड आहे. या सुपरस्टारचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळुरूमधील एका गरीब कुटुंबात झाला. रजनीकांत यांना एकूण चार भावंडं होती. या भावंडांमध्ये सर्वात लहान रजनीकांत होते. रजनीकांत यांचे वडील रामोजीराव गायकवाड हे हवालदार होते. तर, आई जिजाबाई या कुटुंब सांभाळत होत्या. मात्र, आईच्या निधनानंतर रजनीकांत यांचे कुटुंब विस्कळीत झाले.