मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Coconut Water Benefits: नारळ पाणी त्वचेपासून ते हाडांपर्यंत आहे खूप फायदेशीर!

Coconut Water Benefits: नारळ पाणी त्वचेपासून ते हाडांपर्यंत आहे खूप फायदेशीर!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Dec 08, 2022 04:15 PM IST

Health Care: नारळाचे पाणी त्या नैसर्गिक ज्यूसपैकी एक मानले जाते, जे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजे वाढवण्यास मदत करते.

नारळाचे पाणी
नारळाचे पाणी (Freepik)

महिलांच्या आरोग्यासाठी नारळपाणी नेहमीच खास मानले गेले आहे. गर्भधारणेपासून ते शरीराच्या अनेक समस्यांवर हा रामबाण उपाय मानला जातो. नारळाचे पाणी त्या नैसर्गिक रसांपैकी एक मानले जाते, जे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजे वाढवण्यास मदत करते. नारळाच्या पाण्यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-मायक्रोबियल आणि अँटीवायरल गुणधर्म असतात. याचा त्वचेपासून हाडांपर्यंत अनेक फायदे आहेत. जाणून घ्या नक्की काय काय फायदे आहेत.

१) नारळाचे पाणी जीवाणूविरोधी आहे आणि बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करते.

२) यासोबतच, यूटीआय दरम्यान शरीरातील अशक्तपणा, वारंवार लघवी केल्याने होणारे निर्जलीकरण आणि पाय आणि हातांमध्ये जडपणा कमी होतो.

३) नारळ पाण्यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-मायक्रोबियल आणि अँटीवायरल गुणधर्म असतात, जे त्वचेला संसर्गापासून वाचवण्यास मदत करतात.

४) मुलांना नारळ पाणी दिल्याने त्यांच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते.

५) नारळाच्या पाण्यात उच्च कॅल्शियम आढळते, ज्यामुळे मुलांची हाडे मजबूत आणि निरोगी बनण्यास मदत होते.

६) नारळ पाणी यूटीआई मध्ये देखील फायदेशीर आहे.

७) नारळाच्या पाण्यात सोडियम आणि निरोगी साखरेचे प्रमाण आढळते.

८) या पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असल्याने शरीर हायड्रेटेड राहते आणि पाण्याची कमतरता पूर्ण होते.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग