मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Vitamin K: हृदय आणि हाडे निरोगी ठेवण्यासाठी आहारात समाविष्ट करा व्हिटॅमिन ‘के’ने समृद्ध पदार्थ

Vitamin K: हृदय आणि हाडे निरोगी ठेवण्यासाठी आहारात समाविष्ट करा व्हिटॅमिन ‘के’ने समृद्ध पदार्थ

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Dec 09, 2022 01:14 PM IST

Benefits of vitamin K: व्हिटॅमिन 'के' शरीरात निरोगी हाडे आणि ऊतींसाठी प्रथिने तयार करण्यास मदत करते. ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

व्हिटॅमिन के
व्हिटॅमिन के (Freepik)

Health Care: आपल्या शरीराला सामान्य वाढ आणि विकासासाठी जीवनसत्त्वे आवश्यक असतात. व्हिटॅमिन 'के' शरीरात निरोगी हाडे आणि ऊतींसाठी प्रथिने तयार करण्यास मदत करते. हे रक्त गोठण्यासाठी प्रथिने तयार करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. जर तुमच्या शरीरात पुरेसे 'व्हिटॅमिन के' नसेल तर जास्त रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. जर तुम्ही रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल त्यामुळे व्हिटॅमिन 'के' च्या प्रमाणाबाबत काळजी घ्यावी. व्हिटॅमिन 'के' चे अनेक प्रकार आहेत. बहुतेक लोकांना भाज्या आणि डार्क बेरीजसारख्या वनस्पतींमधून व्हिटॅमिन के मिळते. आपल्या आतड्यांमधील बॅक्टेरिया देखील काही प्रमाणात व्हिटॅमिन के तयार करतात. व्हिटॅमिन 'के' बद्दल जाणून घेऊया.

व्हिटॅमिन 'के' चे फायदे काय आहेत?

मेडिकल न्यूज टुडेच्या म्हणण्यानुसार, जीवनसत्त्वे हे चरबी-विरघळणाऱ्या जीवनसत्त्वांचा समूह आहे जे रक्त गोठण्यास, हाडांचे मेटाबॉलिज्म आणि रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.

१) व्हिटॅमिन के मजबूत हाडे राखण्यास आणि हाडांची डेंसिटी वाढविण्यास मदत करते.

२) व्हिटॅमिन के रक्तदाब कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य योग्य राहते.

३) व्हिटॅमिन के हार्मोनचे नियमन राखते, ज्यामुळे मासिक पाळीच्या समस्या जसे की वेदनापासून आराम मिळतो.

४) व्हिटॅमिन के रोगप्रतिकारक शक्तीचे संरक्षण आणि मजबूत करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

व्हिटॅमिन 'के' कोणत्या गोष्टींमधून मिळू शकते?

व्हिटॅमिन 'के' चे चांगले नैसर्गिक अन्न स्रोत म्हणजे पालक, ब्रोकोली अशा भाज्या, त्यासोबतच शेंगा आणि सोयाबीनमधूनही व्हिटॅमिन के मिळते. याखेरीज अंडी, स्ट्रॉबेरी, मांस यामधूनही व्हिटॅमिन के मिळते. याशिवाय व्हिटॅमिन 'के'चे सप्लिमेंट्स डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच वापरावेत.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग