मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  केसांना तूप लावल्याने मिळतात हे अमेझिंग फायदे, पार्लरमध्ये जाण्याची भासणार नाही गरज

केसांना तूप लावल्याने मिळतात हे अमेझिंग फायदे, पार्लरमध्ये जाण्याची भासणार नाही गरज

Oct 05, 2022, 03:49 PM IST

    • Ways To Use Ghee For Hair : तुपामध्ये व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-ई सारखे घटक असतात जे केसांसाठी खूप उपयुक्त मानले जातात. आठवड्यातून एकदा केसांना तूप लावल्यास केसांच्या सर्व समस्या सहज दूर होतात.
केसांना तूप लावण्याचे फायदे

Ways To Use Ghee For Hair : तुपामध्ये व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-ई सारखे घटक असतात जे केसांसाठी खूप उपयुक्त मानले जातात. आठवड्यातून एकदा केसांना तूप लावल्यास केसांच्या सर्व समस्या सहज दूर होतात.

    • Ways To Use Ghee For Hair : तुपामध्ये व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-ई सारखे घटक असतात जे केसांसाठी खूप उपयुक्त मानले जातात. आठवड्यातून एकदा केसांना तूप लावल्यास केसांच्या सर्व समस्या सहज दूर होतात.

Benefits of Applying Ghee on Hair : आजकाल प्रत्येक माणूस कोरडे केस, केस गळणे, निर्जीव होण्याच्या समस्येने त्रस्त आहे. केस गळण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी लोक पार्लरमध्ये जाऊन महागडे ट्रीटमेंट घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत. परंतु या उपचारांमध्ये असलेली रसायने केसांची मुळे मजबूत होण्याऐवजी त्यांना कमकुवत बनवतात. त्यामुळे केसगळती कमी होत नाही. जर तुमचे केसही निर्जीवपणामुळे तुटत असतील तर तुमच्या स्वयंपाकघरात असलेले तूप तुम्हाला त्यांची चमक आणि आरोग्य परत आणण्यास मदत करू शकते. तुपामध्ये व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-ई सारखे घटक असतात जे केसांसाठी खूप उपयुक्त मानले जातात. जर आठवड्यातून एकदा केसांना तूप लावले तर केसांच्या सर्व समस्या सहज दूर होऊ शकतात. चला जाणून घेऊया केसांना तूप लावण्याचे कोणते फायदे आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Mint Leaves: उन्हाळ्यातील अनेक समस्यांवर उपाय आहेत पुदिन्याची पानं, जाणून घ्या घरी कसे वाढवावे

joke of the day : मी नेता झालो तर आख्खा देश बदलून टाकेन असं जेव्हा नवरा बायकोला सांगतो…

Bel Juice Benefits: उन्हाळ्यात रोज प्या बेल फळाचे ज्यूस, मधुमेहापासून वेट लॉसपर्यंत ठरेल फायदेशीर

joke of the day : बायको हरवल्याची तक्रार द्यायला जेव्हा नवरा पोस्ट ऑफिसमध्ये जातो…

केसांचा पोत सुधारतो

केस मजबूत आणि निरोगी ठेवण्यात केराटिनचा मोठा वाटा असतो. यामुळेच लोक पार्लरमध्ये महागड्या केराटिन ट्रीटमेंटसाठी जातात. पण तुम्हाला माहित आहे का की तूप व्हिटॅमिन-ई ने भरपूर आहे आणि केराटिन वाढवण्यास मदत करते. केसांवर याचा नियमित वापर केल्याने केसांचा पोत सुधारतो.

डँड्रफ कमी करण्यास उपयुक्त

डँड्रफ दूर करण्यासाठी तूप वापरणे फायदेशीर ठरू शकते. केसातील कोंडा होण्याचे मुख्य कारण मालासेझिया फर्फर फंगस आहे असे मानले जाते. अशा स्थितीत तुपाचा वापर इतर काही घटकांसोबत केल्यास मालासेझिया फरफर नावाच्या बुरशीची वाढ रोखण्यास मदत होते. ज्यामुळे कोंडा कमी होऊ शकतो.

ग्रे हेअर पासून संरक्षण

आज वाढत्या तणावामुळे लोकांचे केस लहान वयातच पांढरे होऊ लागले आहेत. याशिवाय सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे केसांमध्ये असलेल्या केराटिनचेही नुकसान होते, त्यामुळे केसांचा नैसर्गिक रंग बदलू लागतो आणि केस पांढरे होऊ लागतात. पण तूप केराटिनला प्रोत्साहन देते, ज्यामुळे केस अकाली पांढरे होण्यापासून वाचतात.

केसांची चांगली वाढ

तुपातील व्हिटॅमिन-ए आणि ई सारखे पोषक घटक केसांची वाढ चांगली ठेवण्यास मदत करतात. याशिवाय, हे टाळूचे संक्रमण दूर करण्यास देखील मदत करते.

केसांना रेशमी बनवते

तुपात व्हिटॅमिन-ए, ई आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते. तुपामध्ये स्मूथ आणि ल्युब्रिकेंट घालण्याची क्षमता असल्याचे एका संशोधनात नमूद करण्यात आले आहे. या आधारावर असे गृहीत धरले जाऊ शकते की केसांना तूप लावल्यास त्यातील ओलावा टिकवून ठेवता येतो, ज्यामुळे केस मऊ राहू शकतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग